नवीन नांदेड| दुधडेअरी ते गोविंद गार्डन हाडको आणि आंबेडकर चौक लातूर फाटा ते सिडकोचे जुने नाईक कॉलेज पर्यंतची स्ट्रीट लाईट गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने नागरीकासह वाहन धारकांची होणारी गैरसोय लक्षात घेता अनेक वेळा लेखी निवेदन व मनपा आयुक्त यांच्यी भेट घेऊन सविस्तर चर्चा करून अखेर माजी नगरसेविका सौ.वैजयंती गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते भि.ना. गायकवाड यांच्या सतत केलेल्या पाठपुरावा आणि नांदेड न्यूज लाइव्हने प्रकाशित केलेल्या वृत्तामुळे मनपाच्या विद्युत विभागाने स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असलेल्या अनेक बल्ब व वायरिंग विद्युत प्रवाह कामांना सुरुवात केली आहे.
दुध डेअरी ते गोविंद गार्डन हडको तर डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर फाटा ते वसंतराव नाईक जुने महाविद्यालय या पर्यंत रस्त्याचा मधोमध असलेल्या अनेक स्ट्रीट लाईट गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना व वाहनधारकांना अंधारातुन प्रवास करावा लागत होता तर अंधाराचे साम्राज्य असल्याने वाहनधारकात चोरीची भिंती होती, मुख्य मार्गावर अंधाराच्या साम्राज्य मुळे जाणाऱ्या येणाऱ्या वाहन धारकांना कसरत करावी लागत होती.८ आणि ४ वर्षांपासून बंद होती.
या प्रकरणी माजी नगरसेविका सौ.वैजयंती गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते भि.ना.गायकवाड यांनी मार्च २०२४ पासुन सतत मनपा आयुक्त डॉ .महेश कुमार डोईफोडे यांच्याकडे लेखी निवेदन पाठपुरावा केला, याबाबतचे वृत्त नांदेड न्यूज लाइव्हने प्रकाशित करून समस्यां मांडल्यानंतर काम सुरू झाले. येत्या दहा दिवसांत हे दुरूस्ती काम संपल्यानंतर सिडको हडकोच्या मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईट सर्व पथदिवे सुरू होतील अशी माहिती देण्यात आली आहे.