नवीन नांदेड l चार जमीनग्रस्त पाल्याने स्वारातीम विघापिठ सेवेत तात्काळ सेवेत रुजू करून घेवून न्याय द्यावा यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ समोर चार जणांनी 6 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे, परंतु दोन दिवसांचा कालावधी होऊनही विघापिठ प्रशासनाने दखल घेतली नाही, ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी उपोषण स्थळी पोलीस बंदोबस्त दिला असुन उपोषण कर्ते यांच्यी वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून ग्रामस्थांनी उपोषण स्थळी भेट दिली आहे.


स्वारातीम विघापिठ कुलगुरू यांना दिलेल्या निवेदनात , आम्ही शेतकरी पाल्य वांरवार पत्रव्यवहार करूनही आम्हाला विद्यापीठ न्याय देत नाही व्यतीरिक्त बाहेरचे व्यक्ती विद्यापीठ सेवेत सामावून घेत आहे,आम्ही आमची जमीन विद्यापीठाला देवून चूक केली का, आपण आम्हाला काम देण्याचे सोडून बाहेरील व्यक्तीनां कामावर घेतलेले अनेक आहेत.


म्हणून आपण विद्यापीठाने ठरलेल्या नियमानुसार आम्हाला 5 वर्ष, 11 महिने करार पध्दतीने कामावर घ्यावे व नंतर पूर्णवेळ सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या नियमानुसार आम्ही काम करायला तयार आहोत, म्हणून तात्काळ आम्हाला संधी द्यावी. वारंवार विनंती अर्ज करुनही आमच्या कडे दुर्लक्ष करीत आहेत. आम्हाला न्याय मिळत नसल्यामुळे तरी आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.


आम्हाला अमरण उपोषण करण्या व्यतीरिक्त आम्हाला दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने दिनांक 06/08/2025 रोजी अमरण उपोषणाला पंजाब पांडुरंग हंबर्डे, अंकुश अशोकराव हंबर्डे, हणमंत मुरलीधर हंबर्डे,अगंद रामराव हंबर्डे सुरुवात केली आहे,उपोषणाची दखल घेऊन ग्रामीण पोलीस स्टेशनने पोलीस बंदोबस्त दिला असुन वैद्यकीय तपासणी साठी आरोग्य विभागाशी पत्रव्यवहार केला आहे.ऊपोषणाचा दुसऱ्या दिवशी ही विघापिठ प्रशासनाने या बाबत दखल घेतली नसल्याचे सांगण्यात येत आहे.



