उस्माननगर l महाराष्ट्रात ग्रामीण बँक ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच मदतीला धावून येणारी बँक म्हणून ओळखले जाते.सध्या राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पुरपरिस्थीती मुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.त्या अनुषंगाने उस्माननगर महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे थकीत पिककर्ज धारकांसाठी विविध संपूर्ण व्याजमाफी योजना राबविण्यात येत आहे.” शेतकरी समाधान योजना..” व शेतकरी नवसंजीवनी योजना ” या योजनेचा परिसरातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन उस्माननगर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रकाश कांबळे यांनी केले आहे.


महाराष्ट्र ग्रामीण बँक ही भारत सरकार ची उपक्रमशील असलेली बँक असून या बँकेचे जाळे हे संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी नेहमीच मदतीला धावून येणारी बँक म्हणून ओळखली जाते, सध्या राज्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे व पूरस्थिती मुळे राज्यातील शेतकरी संकटात अडकला आहे

त्या अनुषंगाने बँकेतर्फे थकीत पीककर्ज धारकांसाठी विविध संपूर्ण व्याजमाफी योजना राबविण्यात येत आहेत जसे “शेतकरी समाधान योजना”, “शेतकरी नवसंजीवनी योजना” ज्या अंतर्गत जुन्या थकीत कर्जात पूर्ण व्याजमाफी मिळणार असून शेतकऱ्याला मुख्य प्रवाहात आणण्याचा बँकेचा मानस आहे. सध्या ची पूरस्थिती पाहता थकीत शेतकऱ्यांना वाढीव कर्ज सुद्धा बँकेतर्फे उपलब्ध करून दिले जाणार आहे, सदर योजना ही मर्यादित काळासाठी असून सर्व पात्र शेतकऱ्यांनी याचा त्वरित लाभ घ्यावा असे आवाहन उस्माननगर चे शाखा व्यवस्थापक प्रकाश कांबळे यांनी केले आहे.



