नांदेड | पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा घेतलेला आहे. परंतु फळपिकांची ई-पीक पहाणी डीजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ऑपद्वारे केली नाही त्यांनी 25 एप्रिल 2025 पर्यंत ई-पिक पाहणी पुर्ण करावी. अन्यथा 12 जून 2024 रोजीच्या शासन निर्णय मधील तरतुदी नुसार 7/12 उताऱ्यावर ई-पिक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपिक विम्याचा लाभ दिला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी केले आहे.


पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना 12 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीमार्फत मृग बहार सन 2024 मध्ये मोसंबी, चिकू, पेरु, सिताफळ व लिंबू या 5 फळपिकांसाठी तर आंबिया बहार सन 2024-25 मध्ये संत्रा, मोसंबी, केळी, आंबा व पपई या 5 फळपिकांसाठी नांदेड जिल्ह्यात फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी 12 जून 2024 रोजीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

