नांदेड

Ashadhi Ekadashi । आषाढी एकादशीनिमित्त १७ जुलै रोजी नांदेड येथे “भव्य माऊली दिंडी” प्रती पंढरपूर आयोजन – डॉ. रमेश नारलावार -NNL

नांदेड। नांदेडमध्ये आषाढी एकादशीनिमित्त १७ जुलै रोजी नांदेड येथे “भव्य माऊली दिंडी” प्रती पंढरपूर आयोजन करण्यात आले असून, माऊली दिंडीचे मुख्य संयोजक डॉ. रमेश नारलावार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शोभा यात्रेची पूर्ण तयारी झाली आहे. शोभा यात्रेत विठ्ठल रुखुमाईचा देखावा. टाळकरी, विणेकरी, मृदुंगधारी यांचा समावेश राहणार आहे. देखावा म्हणून लेझीम पथक, झाशीची राणी व लहान मुलाचे शौर्य पथकाचे प्रात्यक्षिक आहे. या दिंडीचे प्रमुख दोन उद्देश आहेत.

भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व हिंदू जनजागरण व हिंदू एकत्रीकरण (हिंदू म्हणजे जैन, बुद्ध, शीख व इतर हिंदू) ज्या योगे हिंदूनी आपल्यावरील अन्यायाचा प्रतिकार करावा. तसेच सर्व डॉक्टर संघटना सर्व व्यापारी व समाज संघटना भजनी, महिला मंडळ, राजस्थानी महिला मंडळ, आर्य वैश्य महिला मंडळ व इतर अनेक संघटनांनी शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी आव्हान केले आहे. तसेच नानकसाई फाऊंडेशन नांदेड चे अध्यक्ष श्री पंढरीनाथ बोकारे साहेबांनी पण सर्व पत्रकार बंधू व सर्व समाजाला दिंडीसाठी सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे. या दिंडी सोहळ्यात नांदेड मधील भाविक भक्त तसेच सर्व धर्मातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आव्हान डॉ. नारलावार यांनी केले. १७ जुलै २०२४ वार बुधवार रोजी या दिंडीची शोभायात्रा दुपारी २.३० वाजता विठ्ठल रुक्माई मंदीर, संत नामदेव मंदीर (गायत्री मंदीराजवळ) नवीन पुलाखाली येथून निघून मोंढा येथील टॉवर जवळून कलामंदीर व स्वामी समर्थ मंदीर पर्यंत जाणार आहे. तेथे महाप्रसादाने सांगता होणार आहे. मोठ्या संख्येने सामील व्हा व या सोहळ्याचे आनंदयात्री व्हावे असे आवाहन डॉ. रमेश नारलावार, श्री शंकरराव सिंगेवार, गणेश ठाकूर, मोहन पाटील, डॉ. तळणकर, मोरे काका, डॉ. रायेवार, अरुण दमकोंडवार, यांनी केले आहे. व महिला आघाडी कडून सौ. चंदा काबरा, सौ. प्राची चौधरी व कु. ज्योती पाटील यांनी केले आहे.

या निमित्ताने हिंदू संस्कृती व एकतेचे दर्शन घडवणे हे सुद्धा महत्वाचे आहे. यात जैन, बुद्ध, शीख, व इतर सर्व हिंदू समाज एकत्र आणण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. जे की आज समाज व देश हितासाठी आवश्यक आहे असे वाटते. खरे हिंदुत्व म्हणजे माणुसकी जपणे व तसेच इतरांसाठी त्याग करणे हेच आहे. तसेच वेगवेगळे सामाजिक संदेश आम्ही स्लोगनच्या माध्यमातून समाजासमोर नेत आहोत असे डॉ. रमेश नारलावार यांनी यावेळी सांगितले आहे. या वर्षी डॉ. रमेश नारलावार व मोहन पाटील ह्यांनी १८६५० रुपर्याची औषधी पंढरपूर दिंडीसाठी दिली आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button