Ashadhi Ekadashi । आषाढी एकादशीनिमित्त १७ जुलै रोजी नांदेड येथे “भव्य माऊली दिंडी” प्रती पंढरपूर आयोजन – डॉ. रमेश नारलावार -NNL
नांदेड। नांदेडमध्ये आषाढी एकादशीनिमित्त १७ जुलै रोजी नांदेड येथे "भव्य माऊली दिंडी" प्रती पंढरपूर आयोजन करण्यात आले असून, माऊली दिंडीचे मुख्य संयोजक डॉ. रमेश नारलावार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शोभा यात्रेची पूर्ण तयारी झाली आहे. शोभा यात्रेत विठ्ठल रुखुमाईचा देखावा. टाळकरी, विणेकरी, मृदुंगधारी यांचा समावेश राहणार आहे. देखावा म्हणून लेझीम पथक, झाशीची राणी व लहान मुलाचे शौर्य पथकाचे प्रात्यक्षिक आहे. या दिंडीचे प्रमुख दोन उद्देश आहेत.
भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व हिंदू जनजागरण व हिंदू एकत्रीकरण (हिंदू म्हणजे जैन, बुद्ध, शीख व इतर हिंदू) ज्या योगे हिंदूनी आपल्यावरील अन्यायाचा प्रतिकार करावा. तसेच सर्व डॉक्टर संघटना सर्व व्यापारी व समाज संघटना भजनी, महिला मंडळ, राजस्थानी महिला मंडळ, आर्य वैश्य महिला मंडळ व इतर अनेक संघटनांनी शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी आव्हान केले आहे. तसेच नानकसा...
