नांदेड| ईनामी खिदमतमाश जमिनीवर राज्य संरक्षित स्मारका लगत करण्यात आलेल्या अवैध अतिक्रमण धारकावर कायदेशीर कार्यवाही करावी व सद्यपरिस्थितीत जिल्हा वक्फ अधिका-यांनी जायमोक्याचा वस्तूनिष्ठ अहवाल तक्रारदार यांच्या समक्ष बनवून अवैध अतिक्रमण विनविलंब निष्काशित करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे तक्रारकर्ते तथा साजिद गफुर कुरेशी यांनी जिल्हा वक्फ अधिका-यांकडे केली आहे.


बिलोली शहरातील ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारक मध्ययुगीन वास्तू कला असलेली मस्जिद कला दर्गाह हजरत नवाब सर्फराज खान सहाब याच्या ईनामी खिदमतमाश जमीन सर्वे. न.577,580 मध्ये राज्य स्मारकाच्या भोवताली कोणत्याही विभागाची पूर्व परवानगी न घेता मंगलकार्यालय,विहिरींवर अतिक्रमण करून टिनपञे मारण्यात आले. येथील स्वयंघोषित वारसदार हे भुमाफियाना हाताशी धरून ईनामी जमीन बळकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.गावातील मुसल्लीयान मार्फत याबाबत अनेक तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आले.या जागेत स्वयंघोषित वारसदारांनी अतिक्रमण धारकांसोबत भाडेकरार,सौदा,चिठी,गहाण खत,विक्रीखत असे अनेक प्रकार करुन करार केल्याचे समोर आले आहे जे की वक्फ अधिनियम 1995 कलम चे उल्लंघन असून कलम ५२,५२A,५४,६४ च्या नियमानुसार अतिक्रमणधारकांविरुध्द कारवाई करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रकरण प्रलंबित आहे.



याबाबत जिल्ह्याचे वक्फ अधिकारी अन्सारी यांना वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार देण्यात आली.येथील ईनामी जमिनीवरील अतिक्रमणाचा जायमोक्याचा वास्तूनिष्ठ पंचनामा GPS लोकेशन नुसार पारदर्शकपणे पंचनामा करण्यात यावे असे हि कुरेशी यांनी दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.याबाबत जिल्हा वक्फ अधिका-यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते नाॕट रिचेबल होते.तत्कालिन जिल्हा वक्फ अधिकारी,पुरातत्व विभाग,मंडळअधिकारी यांनी यापुर्वीच या जागेचा पंचनामा करण्यात आला.पंचनामे खुप झाले पण फौजदारी कारवाई कधी असा प्रश्न येथील मुसल्लीयान उपस्थित करत आहे.




