Evict illegal encroachments : ईनामी जमिनीवरील अवैध अतिक्रमण विनाविलंब निष्काशित करा – साजिद कुरेशी -NNL
नांदेड| ईनामी खिदमतमाश जमिनीवर राज्य संरक्षित स्मारका लगत करण्यात आलेल्या अवैध अतिक्रमण धारकावर कायदेशीर कार्यवाही करावी व सद्यपरिस्थितीत जिल्हा वक्फ अधिका-यांनी जायमोक्याचा वस्तूनिष्ठ अहवाल तक्रारदार यांच्या समक्ष बनवून अवैध अतिक्रमण विनविलंब निष्काशित करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे तक्रारकर्ते तथा साजिद गफुर कुरेशी यांनी जिल्हा वक्फ अधिका-यांकडे केली आहे.
बिलोली शहरातील ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारक मध्ययुगीन वास्तू कला असलेली मस्जिद कला दर्गाह हजरत नवाब सर्फराज खान सहाब याच्या ईनामी खिदमतमाश जमीन सर्वे. न.577,580 मध्ये राज्य स्मारकाच्या भोवताली कोणत्याही विभागाची पूर्व परवानगी न घेता मंगलकार्यालय,विहिरींवर अतिक्रमण करून टिनपञे मारण्यात आले. येथील स्वयंघोषित वारसदार हे भुमाफियाना हाताशी धरून ईनामी जमीन बळकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.गावातील मुसल्लीयान मार्फत याब...
