नांदेडकरियर

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 

नांदेड l राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत व महानगरपालिकांमध्ये एकूण ६ हजार १२७ पदे रिक्त असून, या पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु झाल्याचे नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी म्हटले आहे. भोकर मतदारसंघाच्या भाजप आमदार श्रीजयाताई चव्हाण यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदांसंदर्भात लक्षवेधीवरील चर्चेत आ. श्रीजयाताई चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील १६ नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये ७७४ मंजूर पदांपैकी २१७ रिक्त पदे असल्याचा मुद्दा उपस्थित केला. रिक्त पदांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता ही पदे भरण्याबाबत राज्य सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, असा प्रश्न त्यांनी नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांना केला.

त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, २०२३ मध्ये एकूण १ हजार ७८२ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यातील ९६४ कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत. २०२२ च्या वर्षातील सरळसेवा भरतीच्या अनुषंगाने परीक्षा घेण्यासाठी टीसीएस व आयबीपीएस समवेत पत्रव्यवहार सुरु आहे. २० महानगरपालिकांमधील रिक्त पदे भरतीची प्रक्रिया सुरु झाली असून, उर्वरित महापालिकांसाठी भरती प्रस्तावित करण्यात आली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button