Friday, May 29

Tag: Recruitment process in local self-government bodies begins

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 

नांदेड, करियर
नांदेड l राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत व महानगरपालिकांमध्ये एकूण ६ हजार १२७ पदे रिक्त असून, या पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु झाल्याचे नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी म्हटले आहे. भोकर मतदारसंघाच्या भाजप आमदार श्रीजयाताई चव्हाण यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदांसंदर्भात लक्षवेधीवरील चर्चेत आ. श्रीजयाताई चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील १६ नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये ७७४ मंजूर पदांपैकी २१७ रिक्त पदे असल्याचा मुद्दा उपस्थित केला. रिक्त पदांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता ही पदे भरण्याबाबत राज्य सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, असा प्रश्न त्यांनी नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांना केला. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, २०२३ मध...
error: Content is protected !!