हिमायतनगर| तालुक्यातील मौजे सरसम बु. गावाजवळ दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव वेगातील कारणे दुचाकीला जबर धडक दिल्याची घटना आज दिनांक १० रोजी सकाळी घडली आहे. या घटनेत आनंदराव मिराशे पाटील (वय ४८ वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.



याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर या रस्त्यावरून भरधाव वेगात वाहने चालविली जात आहेत. तर अनेक महत्वाच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्याने भोकर हिमायतनगर या रत्स्यावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील किराणा दुकानदार तथा सधन शेतकरी हे आनंदराव मिराशे पाटील (वय ४८ वर्ष) दुचाकीवरून जात होते.



दरम्यान भरधाव वेगात पाठीमागून येणाऱ्या MH14 – C9472 कारणे दुचाकीला पाठीमागून जबर धडक दिली. या कार दुचाकी अपघातात सरसम नजीक त्यांच निधन झाल. अपघात घडताच तात्काळ नागरिकांनी गर्दी केली, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सर्वांसोबत आपुलकीने वागणाऱ्या शांत संयमी माणसाच एैन सणासुदीच्या काळात अकाली निधन झाल्याने सरसम गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, भाऊ, मुले, पुतणे, सुना नातवंडे असा मोठा परीवार आहे.



शेतकरी आनंदराव मिराशे पाटील यांची संपूर्ण हिमायतनगर तालुक्यासह जिल्ह्यात चांगली ओळख होती. शेती करताना ते पशुप्रेमी होते. आत्तापर्यंत त्यांच्या बैलजोडीने ठिकठिकाणी यात्रा काळात अव्वा; नंबरचे बक्षीस जिंकले आहेत. हिमायतनगर यात्रेत तर मागील काळात सलग तीन वर्ष त्यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक जिंकून जिल्ह्यात नावलौकिक मिळविले होते. अश्या पशु प्रेमी शेतकऱ्याचे अपघातात दुःखद निधन झाल्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्यांना सोशल मीडियावर मोडक्या तोडक्या शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

नांदेड न्यूज लाईव्ह परिवाराच्या वतीने शेतकरी आनंदराव मिराशे पाटील याना भावपूर्ण श्रद्धांजली


