A speeding car hit the bike hard : भरधाव वेगातील कारची दुचाकीला जबर धडक; सरसम येथील शेतकरी आनंदराव मिराशे यांचा मृत्यू -NNL
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे सरसम बु. गावाजवळ दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव वेगातील कारणे दुचाकीला जबर धडक दिल्याची घटना आज दिनांक १० रोजी सकाळी घडली आहे. या घटनेत आनंदराव मिराशे पाटील (वय ४८ वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर या रस्त्यावरून भरधाव वेगात वाहने चालविली जात आहेत. तर अनेक महत्वाच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्याने भोकर हिमायतनगर या रत्स्यावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील किराणा दुकानदार तथा सधन शेतकरी हे आनंदराव मिराशे पाटील (वय ४८ वर्ष) दुचाकीवरून जात होते.
दरम्यान भरधाव वेगात पाठीमागून येणाऱ्या MH14 - C9472 कारणे दुचाकीला पाठीमागून जबर धडक दिली. या कार दुचाकी अपघातात सरसम नजीक त्यांच निधन झाल. अपघात घडताच तात्काळ नागरि...
