HomeनांदेडDrain construction : राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकामाचा बोजवारा; हिमायतनगरात आंधळ्या कारभाराचा कळस

Drain construction : राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकामाचा बोजवारा; हिमायतनगरात आंधळ्या कारभाराचा कळस

हिमायतनगर, अनिल मादसवार | शहर परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकाम हे पूर्णपणे आंधळ्या व मनमानी कारभाराचे उदाहरण ठरत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूच्या नाल्यांचे काम सुरू असले तरी नालीत पाणी जाण्याची कोणतीही योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही, त्यामुळे या तथाकथित विकासकामावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

धनोरा ते भोकर या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून करण्यात आलेल्या रस्त्याला मोठमोठे तळे गेले आहेत. पण तू अजूनही बहुतांश ठिकाणी काम अर्धवट असून हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या दोन्ही बाजूने नाल्या केले नसल्याने मागील अनेक वर्षात पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

नाल्याचे काम करण्यात यावे अशी वारंवार मागणी केल्यानंतर गेल्या महिन्याभरापासून कामाला सुरुवात झाली. मात्र यातही ठेकेदाराने मनमानी कारभार सुरू केले असून त्यामुळे पावसाळ्याचे पाणी अरुंधनाल्यातून जाईल कसे आणि पावसाचे पाणी येतातचं नाल्या टिकतील की..? नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

कारण नालीचे काम करताना थेट मातीवरच काँक्रीट टाकून नाल्या धातू मात्र पद्धतीने केल्या जात असून याची क्युरिंग होत नसल्याने स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वीच संबंधित यंत्रणांना सूचित केले होते की, चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या या कामाविरोधात आंदोलन छेडले जाईल, मात्र तरीही संबंधित ठेकेदारावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे. कोणतेही तांत्रिक निकष न पाळता मनमानी पद्धतीने नालीचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे.

FB IMG 1769600519110 Drain construction : राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकामाचा बोजवारा; हिमायतनगरात आंधळ्या कारभाराचा कळस

विशेष म्हणजे, राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने शहरातून रस्त्याची रुंदी कमी करून डिव्हायडर गायब केले आहे. एवढेच नाही तर शहरातून उड्डाणपूल मंजूर असताना तो देखील केला नसल्याने आता होत असलेल्या नाल्या तब्बल तीन फूट बाजूला हलवून बांधकाम केले जात आहे. यामुळे भविष्यात वाहतुकीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असून, अपघातांचा धोका वाढू शकतो.

FB IMG 1769600522962 Drain construction : राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकामाचा बोजवारा; हिमायतनगरात आंधळ्या कारभाराचा कळस

या ठेकेदाराच्या कामाबद्दल मागील चार-पाच वर्षात शेकडो तक्रारी मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत व प्रशासनाच्या वरिष्ठ स्तरापर्यंत गेल्या. परंतु वरच्या पातळीवरून ठेकेदारास पाठबळ मिळत आहे का? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणाकडे प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित यंत्रणांनी तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिक व स्थानिक संघटना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहेत. चुकीच्या नियोजनातून होणारा विकास हा विकास नसून, तो सार्वजनिक सुरक्षेवर घाला असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे. करण्यात येत असलेले निक्रेष्ठ कामे पावसाच्या पुरात वाहून जाऊन शासनाच्या कोट्यावादीच्या निधीचे वाटोळे होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments