नायगाव l पूरग्रस्त भागातील नायगाव व बिलोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरम अंतर्गत मौजे कुंचेली व प्राथमिक आरोग्य केंद्र लोहगाव अंतर्गत मौजे दुगाव येथे आज दि. 5 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख मॅडम यांनी भेट दिली.


पूरग्रस्त गावात आरोग्य विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. किटकजन्य व जलजन्य आजार (डेंग्यू, हिवताप) व इतर कोणत्याही साथीच्या आजारांचा उद्रेक होऊ नये या बाबत खबरदारी कशी घ्यावी या बाबत सदरील गावातील ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. या गावा मध्ये आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका किटक शास्त्रीय सर्वेक्षण, ताप रुग्ण सर्वेक्षण, बोअर पाणी तपासणी व इतर आजार बाबत माहिती घेण्यात यावी या बाबत आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांनी आदेशीत केले. सोबत बिलोली तालुका आरोग्य अधिकारी डॉ गणपत वाडेकर, वाहन चालक गणेश अंबेकर हे होते.


तसेच यावेळी डॉ जाधव, आरोग्य सेविका श्रीमती ज्योती ढवळे, आरोग्य सेवक अनिल गायकवाड व इतर आरोग्य कर्मचारी बंधू, भगिनी उपस्थित होते.



