लोहा | देशाच्या नकाशावर प्रसिद्ध अश्व बाजार म्हणून नावारूपाला येत असलेल्या माळेगाव यात्रेला १८ तारखेपासून आरंभ होत आहे. यात्रेकरू, भाविकभक्त, छोटे मोठे व्यापारी याना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तयारीला गती दिली आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी ( १२ डिसेंबर) स्वतः जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी माळेगाव यात्रा (Malegaon Yatra) परिसराची पाहणी केली. विविध सोयी सुविधांचा आढावा घेतला व काही महत्वाच्या सूचना केल्या.


माळेगाव यात्रा परिसरात कामाचा आढावा घेण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी मंदिर परिसर, पार्किंग, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त या बाबींची सविस्तर माहिती घेतली। . यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच ग्रामपंचायत, मंदिर समिती आणि प्रशासनाने परस्पर समन्वय ठेवून काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

त्याच्या सोबत उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी जगताप, तहसीलदार विठ्ठल परळीकर,कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता शिवाजी राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक, माळेगावचे सरपंच प्रतिनिधी हनुमंत धुळगंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


दरवर्षी लाखो भाविक श्री खंडोबाच्या दर्शनासाठी माळेगावात येतात. त्यामुळे वाहतूक, आरोग्य, पाणीपुरवठा आणि सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या तयारीबद्दल जिल्हाधिकारी कर्डिले यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या अश्व बाजारात होत नसलेली तयारीचा आढावा घेतला सर्व विभागांनी समन्वयाने दिलेले काम करावेअडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. असे निर्देश दिले जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी महत्वाच्या सूचना संबंधितांना केल्या.


माळेगाव यात्रा कार्यक्रम असे असतील
१८ डिसेंबर देवस्वारी व पालखी पुजन, दुपारी ३ वाजता कृषी प्रदर्शनाचे व विविध स्टोल उद्घाटन, १९ डिसेंबर पशु, अश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धाचे उद्घाटन, महिला व बालकासाठी स्पर्धा, २०डिसेंबर -कृषिनिष्ठ शेतक-यांचा सत्कार (दुपारी ३ वाजता) दिनांक २२ तारखेला महिला आरोग्य शिबीर (सकाळी ११.०० वा.) २२ डिसेंबर दुपारी एक वाजता लावणी महोत्सव दिनांक २३ डिसेंबर सकाळी दहा वाजता पशुप्रदर्शन व दुग्ध स्पर्धा बक्षीस वितरण, दिनांक २३ डिसेंबर, कुस्त्याची प्रचंड दंगल, दिनांक २४ तारखेला पारंपारीक लोककला महोत्सव, दिनांक २५ डिसेंबर रोजी शंकरपट (बैलजोडी बैलगाडा शर्यत) असे कार्यक्रम होणार आहेत.
माळेगाव यात्रा परिसराची पाहणी करताना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनश कुमार, उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी जगताप, तहसीलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी रामेश्वर गोरे, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता शिवाजी राठोड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक आदी अधिकारी उपस्थित.

