नवीन नांदेड l डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील परिचारिकांच्या वतीने परिचारिका संघटनेच्या माध्यमातून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या अन्नधान्य 200 किटचे वाटप सामाजिक बांधिलकी जोपासत केले असून या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.


यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातील पूर परिस्थिती लक्षामध्ये घेता महाराष्ट्रातील काही भाग जसे कि, नांदेड परभणी लातूर सोलापूर बीड आदि भागामध्ये पूर परिस्थिती मुळे शंभर टक्के शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे पहावयाला मिळाले आहे. आपल्या सर्वांचा पोशिंदा आपला शेतकरी मात्र सर्व काही पूर परिस्थिती मध्ये गमावून बसला होता. शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणि घरात व तसेच शेतात पाणीच पाणी उरले होते हजारो हेक्टर जमीन पाण्या काही होती.

घरा दारात पाणीच पाणी झाले होते, गुरे जाणवरे देखील पुरात वाहून गेल्याचे आपण सर्वांनी समाज माध्यमातून तसेच प्रत्यक्षरित्या बघितले. जगाला शेतीच्या माध्यमातून अन्न पुरविणाऱ्या आपल्या शेतकरी राजावर दुःखाच्या डोंगर कोसळला होता.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड च्या वतिने डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील सर्व परिचारिका वर्गाला आर्थिक मदती साठी आवाहन करण्यात आले होते.


सामाजिक बांधिलकी जोपासत पूरग्रस्तांना लागणाऱ्य तांदूळ,साखर , गोडतेल, गव्हाचे पीठ,चहा पावडर,तिखट, हळद ,बिस्कीट,मिठपुड,डाळ व ब्लॅंकेट अशा जीवनवश्यक वास्तूचे एकत्रित संकलन करून संस्थाप्रमुख अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख,यांच्या अध्यक्षतेखाली, व तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजयकुमार कापसे, रुग्णालयाच्या मेट्रोन श्रीमती अल्का जाधव,उप -वैद्यकीय अधीक्षक डॉ.शिवानंद , महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड विष्णुपुरी च्या अध्यक्षाश्रीमती.प्रतिभा वाघदरीकर, सचिव केशव जिंकलवाड, सल्लागार श्रीमती.रेवता सामलवार, संघटक श्रीमती.अर्चना मुंगल तसेच देणगीदार परिचारिका वर्ग यांच्या उपस्थितीत सदरील जीवनावश्यक वस्तूंचे अनावरण करून सदरील 200 किट पूरग्रस्तांना वाटप करण्यासाठी नेण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील काही भागत वसरणी, पुणेगांव, पुयडवाडी, सिद्धनाथ, राहेगाव, किक्की भागातील काही पूरग्रस्तांना त्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सदरील जीवनावश्यक वस्तूचे वाटप परिचारिकांच्या वतीने परिचारिका संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले,सर्व देणगीदारांचे व तसेच मदत कार्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे संघटनेचा वतीने जाहीर आभार मानण्यात आले.

