Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Disaster management training : नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न
नांदेड लाइफस्टाइल October 16, 2025

Disaster management training : नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

प्रशिक्षणाच्या दोन सत्रात एकूण 700 कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग
NNL TeamBy NNL TeamOctober 16, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी किरण अंबेकर यांच्या नियंत्रणाखाली राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) 5 वी बटालियन, पुणे यांच्यामार्फत मौजे काळेश्वर, विष्णुपुरी येथे आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण व सराव सत्र बुधवार 15 ऑक्टोबर रोजी यशस्वीरीत्या पार पडले.

या प्रशिक्षणासाठी कमांडर रविंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखालील 17 जणांच्या दलाने सहभाग घेतला. जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांतील तहसील, पंचायत, पोलीस, मनपा, नगरपरिषद, कृषी आदी विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

भूकंप, पूर आदी आपत्ती प्रसंगी स्वतःचा बचाव कसा करायचा तसेच शोध व बचाव कार्याची अंमलबजावणी कशी करायची याबाबत प्रत्यक्ष हाताळणीसह जवळपास 700 अधिकारी-कर्मचाऱ्यांना दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. नदीकाठच्या पूरप्रवण गावांतील स्थानिक कर्मचारी, मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद, लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलीस स्टेशन क्षेत्रातील पोलीस पाटील, महसूल कर्मचारी तसेच हिमायतनगर येथील नायब तहसीलदार आणि माजी सैनिक हयुम पठाण यांनी त्यांच्या टीमसह सक्रीय सहभाग नोंदवला.

या प्रशिक्षणास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, सर्व तालुक्यांतील नायब तहसीलदार, महसूल, कृषी विभागाचे अधिकारी, सहाय्यक अग्नीशमन अधिकारी निलेश काबळे यांच्यासह मनपाचे अग्नीशमन तसेच शोध व बचाव पथक उपस्थित होते. शोध व बचाव कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा परिचय, सी.पी.आर. पद्धती, आय.आर.बी. रबरी बोटची तयारी व वापर या विषयांवर सविस्तर प्रशिक्षण व सराव देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारकुजी मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पोलीस पाटील प्रविण हंबरडे, विष्णुपुरी यांनी मानले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने जिल्हृयात 6 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाचे विविध ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. या प्रशिक्षणात जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये, पुरप्रवण गावे, होमगार्ड, मनपा, एन.सी.सी., एन.एस.एस., आपदा मित्र, शासकीय अधिकारी-कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हे प्रशिक्षण सत्र यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आज 16 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक नांदेडहून पुण्याकडे रवाना झाले.

by National Disaster Response Force disaster management In Nanded district training conducted
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleS.M. Deshmukh : ३ डिसेंबर रोजी राज्यातील १० हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करणार : एस.एम.देशमुख
Next Article Local bodies elections : स्थानिक स्वराज संस्था निवडणुका महाविकास आघाडीच्या नेतृत्वात लढवा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Madhav Atkore : मरणोत्तर देहदानामुळे आपला देह इतरांच्या कामी येतो – माधव आटकोरे -NNL

August 14, 2024

Five lakh applications are eligible : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात पाच लक्ष अर्ज पात्र -NNL

August 10, 2024

Guardian Minister Atul Save : “सेवा पंधरवडा”चा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2025

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026
Advertisement
टॉप बातम्या

माळेगाव यात्रेतील कृषी प्रदर्शन, विविध स्टॉलचे उद्घाटन -NNL

municipal elections : महानगरपालिका निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज

Bail Pola is celebrated at shivani ; शिवणी येथे भर पाऊसात बैलपोळा उत्साहात साजरा – NNL

State Cabinet pays tribute राज्य मंत्रिमंडळाची ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली -NNL

Birth Anniversary : हुतात्मा जयवंतराव पाटील यांची जयंती साजरी… जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले….

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?