नवीन नांदेड l सिडको गुरूवार बाजार येथे श्रावणमास निमित्ताने 15 ते 21ऑगस्ट दरम्यान शिवकथाकर भागवतचार्य हभप अंकिताताई खांडगे यांचे शिवपुराण कथेस भाविक भक्तांनी ऊत्सफुर्त प्रतिसाद दिला, शेवटच्या दिवशी संत महंत यांच्या तुला करण्यात आलीतर महाआरतीने या कथेची सांगता करण्यात आली, यावेळी महाप्रसादाचा लाभ अनेक भाविक भक्तांनी घेतला.


दि. 15 ते गुरुवार दि. 21 ऑगस्ट 25 दरम्यान श्रावण मासा निमित्त भव्य शिवमहापुराण (शिवकथा) व अष्टोत्तर सहस्त्रधारा रुद्राभिषेक, सव्वा लक्ष बिल्वार्थना, महामृत्युंजय स्वाहाकार होमहवन, व गुरुवर्याचे तुलाभार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,गुरुपुष्य अमृत योगावर परम पुज्य गुरुवर्यचे तुलाभार दिनांक २१ ऑगस्ट गुरुवार सकाळी ११ वाजता व अष्टोत्तर सहस्त्रधारा रुद्राभिषेक सकाळी 8 ते 9 महामृत्युंजय स्वाहाकार होम हवन 9 ते 10, प्रसाद सकाळी 11 ते 12, शिवमहापुराण (शिवकथा) दुपारी 1 ते 4, भागवताचार्य हभप.अंकिताताई खांडगे कल्याण स्वामी संस्थान,चकलंबा ता.पाथर्डी यांच्यी सुमधुर वाणीतून तबलावादक गितेश महाराज मातोळे ,किबोर्ड वादक देवा महाराज ,वादक कृष्णा महाराज खांडगे,व गायक तनुजा ताई घुगे, वैष्णवी ताई यांच्या साथ संगत मुळे संगितमय मधुर श्रावण कथा ऐकावयास मिळाली सप्ताह अंतर्गत सजिव महादेव, पार्वती विष्णू यासह विविध देवाचे देखावे करण्यात आली.


सप्ताह अंतर्गत 20 ऑगस्ट रोजी ढोल ताशांच्या गजरात हभप अंकिताताई खांडगे यांच्ये भव्य दिव्य रथातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शेवटच्या दिवशी नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर, भाजपाचे माजी आमदार अमरभाऊ राजूरकर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे,तुलजेश यादव,सुहास पाटील खराणे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विनोद कांचनगिरे, डॉ.नरेश रायेवार,नवनाथ कांबळे,शितल खांडील,
विजय येवनकर यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी संत डॉ.नंदकिशोर शिवाचार्य लासिन मठ, पुर्णा, वैदांतचार्य दिंगाबर शिवाचार्य महाराज वसमत,श्री.गोवत्सव बालयोगी,व्यंकटी स्वामी महाराज पिंपळगाव,श्री.गोपलनाथ बाबा महाराज आदेश रतनगड,श्रीमंहत मधुबन महाराज कौलंबी,श्री मधुबन महाराज कौलंबी श्री.मुक्तीनाथ गुरू योगीनी महेश्वरी नाथ यांच्या यावेळी भस्म,बेलपान, कवडी, रूद्राक्ष,फळ फुले व ग्रंथांनी तुला करण्यात आली.
शिवपुराण कथा सोहळ्यासाठी राजपुरोहित श्री विरभद्र गजानन मठपती (पिंटू महाराज), यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ कांबळे व व्यवस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराज मित्र मंडळ, श्री. हनुमान जन्मोत्सव समिती, श्री संतोषी माता महीला मंडळ श्री.गुरुकृपा महिला मंडळ, श्री. ओंकारेश्वर महिला मंडळ, श्री पार्वती महिला मंडळ, श्री स्वामी समर्थ भक्तगण सिडको हडको नांदेड व आयोजक सर्व समाज बांधव सिडको-हडको, नांदेड यांनी परिश्रम घेतले


