तिरुपती| आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात एका अज्ञात भक्ताने अपार श्रद्धा व्यक्त करत १२१ किलो सोने भगवान वेंकटेश्वराच्या चरणी अर्पण केले आहे. या सोन्याची बाजार किंमत तब्बल ₹१४० कोटी एवढी आहे. मंदिर प्रशासनाने या देणगीची पुष्टी केली असून, हे सोने धार्मिक सेवा व मंदिरातील विविध कार्यांसाठी वापरले जाणार आहे.


मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी सांगितले की, या भक्ताने व्यवसायाची सुरुवात तिरुपतीत माथा टेकून केली होती. कालांतराने त्याने ६,०००–७,००० कोटींचा उद्योग उभा केला आणि यशाचे श्रेय श्री वेंकटेश्वर स्वामींना देत १२१ किलो सोन्याची देणगी दिली आहे.

सध्या दररोज भगवान वेंकटेश्वराच्या मूर्तीला सुमारे १२० किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. या भक्ताने त्याहून अधिक अर्पण करण्याचा संकल्प केला होता, जो आता पूर्ण झाला आहे. खरोखरच हा प्रसंग भक्ती, श्रद्धा व देवावरील निस्सीम प्रेमाचे द्योतक आहे.



