नवीन नांदेड। मतदार नोंदणी विशेष कार्यक्रमांतर्गत नांदेड दक्षिण मतदारसंघातील कुसुमताई माध्यमिक विद्यालय,सिडको,नांदेड या मतदान केंद्रास उपजिल्हाधिकारी पी.एस.बोरगावकर नुकतीच भेट दिली.
यावेळी त्यांनी नवमतदार नोंदणी, तपशील दुरुस्ती व नाव वगळणी व मतदारयादी शुद्धीकरण व बी.एल.ओ. ॲपपवर प्राप्त झालेल्या फॉर्मची आकडेवारी बाबतचा व मतदार नोंदणी विशेष कार्यक्रमात मतदारांचा प्रतिसाद या बाबींचा आढावा घेतला.यावेळी नायब तहसिलदार (निवडणुक) नितिशकुमार बोलेलू व बी.एल.ओ. सुपरवायझर सौ. उज्वला सोनाळे,मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी.बी.पाटोळे, पी.जी. सुरेवाड,आर.व्ही .दवणे आदी उपस्थित होते.