नांदेड| येथे अर्पण अवयवदान समितीतर्फे येत्या १६ एप्रिल बुधवारी सकाळी १० :३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवनात ३६ व्यक्तीनां देहदान योद्धा पुरस्काराने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली गौरविण्यात येणार आहे.अशी माहिती समितीचे अध्यक्ष माधव अटकोरे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.


या कार्यक्रमात माजी खासदार डॉ व्यंकटेश काब्दे,माजी आमदार गंगाधर पटणे, ज्येष्ठ मराठी साहित्यिक देविदास फुलारी ,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, महापालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे, डॉ शंकराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निलकंठ भोसीकर, निवृत्त शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, माजी जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे , निवृत्त समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, पत्रकार गोविंद मुंडकर,सोशल वर्कर, कमलाकर जमदाडे यांची उपस्थिती लाभणार आहे.


देहदान योध्दा पुरस्कार २०२५ चे मानकरी असे आहेत,वर्षा प्रकाश खरात, कमलाबाई मोहनराव गुलांडे, कामाबाई कमलाकर जमदाडे,शितल अनुप आगाशे, सुजाता विनायक सदावर्ते, संगीता नंदकिशोर जाधव, महानंदा दत्ता तुमवाड, डॉ उर्मिला धूत, एड.नागनाथ बुध्दलवाड,निलाबाई अटकोरे, विश्वनाथ चितोरे,शितल कांबळे डॉ सारिका बकवाड,सुनंदा चंद्रमुनी नरवाडे, भिमराव ईरबाजी तरटे, रंजिता लक्ष्मण गुलांडे, रामेश्वरी मोहन गुलांडे ,कविता सुरेश कलेपवार ,सविता गोपाळराव कौरवार, पुष्पा गंगाधर फिरगवाड, रामराम आनंदराव घुले, भुजंगराव सोनकांबळे, गंगासागर ग्यानोबा सोनकांबळे,एड समता बिराजदार,सुर्यभान कागणे,चंपतराव डाकोरे पाटील, प्रितम भराडिया,

कैलास अमिलकंठवार,बसवंत शेषराव मुंडकर, पांडुरंग विठ्ठल हाके,विजय हत्तीअंबीरे, मनोहरराव दवणे, शामलाल लाहोटी, महादेव लालप्पा पटणे,रामेश्वरी मोहनराव गुलांडे ,शंकर मारोतराव पवार,सविता घरत मुंबई, नयुम मंत्री सोलापूर यांचा समावेश आहे. देहदान योध्दा पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी, युवक, युवती विविध पक्ष आणि संघटना पदाधिकारी,शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी आदींनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग यांनी केले आहे.
