हिमायतनगर| शहरातील मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या वस्तीतील म्हणजेच डॉ.आंबेडकर भाग मागील दोन महिन्यांपासुन भर पावसाळ्यात पाणी टंचाई निर्मण झाली आहे. उन्हाळभर या परिस्थितीत लोकांनी जीवन काढलं, आता मात्र उद्रेक होऊ लागल्याने नगरपंचायतीला निवेदन देऊन पाणी समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. समस्या सुटली नाहीतर नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील डॉ. आंबेडकरनगर, अण्णाभाऊ साठे नगर वस्तीला पाणीपुरवठा करणारी कुपनलिका बंद पडल्यामुळे ऐन पावसाळ्यात येथील दलित नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. डॉ.आंबेडकरनगर, डॉ.अण्णाभाऊ साठेनगर ह्या दोन ठिकाणी जवळपास हजारो घरांना पाणीपुरवठा करणारे दोन कुपनलिका मागील बऱ्याच वर्षापासून चालू होते. या कुपनलिकाच्यां माध्यमातून येथील नागरिकांना पाणी मिळत होते.
परंतु सदरील कुपनलीकांची दुरुस्ती नसल्या कारणाने नेहमीच बंद असतो.अनेकदा येथील नागरिकांनी लोक वर्गणीच्या माध्यमातुन सदरील नादुरुस्त कुपनलिका अनेक वेळा दुरुस्त केले आहे. नगरपंचायतला वार्षिक कुपनलिका दुरुस्तीचे निविदा मंजूर असताना प्रभागातील नागरिकांपासुन पैसे दुरुस्तीसाठी जमा केले जातातचं कसे? यांची चौकशी होणे गरजेचे आहे. दलित,मागासवर्गीय वस्तीतील कुपनलिका वांरवार बंद अवस्थेत कोणामुळे राहत आहेत.
यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी नेहमीच तीव्र टंचाईचा सामना करावा लागतो आहे. कारण याकडे नगरपंचायत विभागातील पाणीपुरवठ्याचे अभियंते,कर्मचारी सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत.प्रशासक राजच्या नावाखाली हम करे सो कायदा असल्यामुळे दलित मागासवर्गीय समाजाला ऐन पावसाळ्यात भीषण पाणीटंचाई कडे लक्ष देत नाहीत.त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव पाण्यासाठी दिवस रात्र भटकंती करण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे येथील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत.शहरात मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी डॉ. आंबेडकरनगर, डॉ.अण्णाभाऊ साठेनगर येथील नादुरुस्त असणारे कुपनलिका तात्काळ सुरु करुन पूर्वी प्रमाणे येथील पाणीपुरवठा सुरळीत करून द्यावे. अशी अपेक्षित मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मधुकरराव हनवते , गणपतराव नाचारे,विशाल हनवते,राहुल गायकवाड,प्रमोद हनवते,स्वप्निल हनवते,सुजीत हनवते, शिलवान कदम यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.