Water shortage | हिमायतनगरातील दलित वस्तीत भर पावसाळ्यात पाणी टंचाई; घागर मोर्चा काढण्याचा इशारा-NNL
हिमायतनगर| शहरातील मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या वस्तीतील म्हणजेच डॉ.आंबेडकर भाग मागील दोन महिन्यांपासुन भर पावसाळ्यात पाणी टंचाई निर्मण झाली आहे. उन्हाळभर या परिस्थितीत लोकांनी जीवन काढलं, आता मात्र उद्रेक होऊ लागल्याने नगरपंचायतीला निवेदन देऊन पाणी समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. समस्या सुटली नाहीतर नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील डॉ. आंबेडकरनगर, अण्णाभाऊ साठे नगर वस्तीला पाणीपुरवठा करणारी कुपनलिका बंद पडल्यामुळे ऐन पावसाळ्यात येथील दलित नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. डॉ.आंबेडकरनगर, डॉ.अण्णाभाऊ साठेनगर ह्या दोन ठिकाणी जवळपास हजारो घरांना पाणीपुरवठा करणारे दोन कुपनलिका मागील बऱ्याच वर्षापासून चालू होते. या कुपनलिकाच्यां माध्यमातून येथील नागरिकांना पाणी मिळत होते.
परंतु सदरील कुपनलीकांची दुरुस्ती नसल्...
