HomeBlogCongress : विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस नेते १० ऑगस्टपासून मराठवाडा आणि विदर्भाच्या...

Congress : विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस नेते १० ऑगस्टपासून मराठवाडा आणि विदर्भाच्या दौ-यावर -NNL

मुंबई| विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सज्ज झाली असून १० ऑगस्टपासून मराठवाडा आणि विदर्भात जिल्हानिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत.

प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री अमित देशमुख हे जिल्हानिहाय बैठका घेऊन काँग्रेस नेते पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

मराठवाड्यातील दौऱ्यात १० ऑगस्ट रोजी लातूर येथे लातूर, धाराशीव, बीड जिल्हा, दिनांक ११ ऑगस्ट रोजी नांदेड येथे नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्हा तसेच दिनांक १२ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा काँग्रेसची बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे. दिनांक १३ ऑगस्ट रोजी विदर्भात बुलढाणा येथे बुलढाणा, अकोला आणि वाशिमची, दिनांक १४ ऑगस्ट रोजी अमरावती येथे अमरावती, यवतमाळ जिल्हयाची बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments