छत्रपती संभाजी नगर। नुकत्याच दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये छत्रपती संभाजीनगर मधले ८ धावपटूनि आपला सहभाग नोंदवला व ८७ कि.मी ची मॅरेथॉन ठराविक वेळेत पूर्ण केली.


हि मॅरेथॉन जगातील खडतर माराथोन मधली एक मनाली जाते. कारण कडक ऊन, पाऊस आणि थंड अशे विविध हवामानातून व धावण्यासाठी उंच डोंगराळ भाग देखील लागतो . जगभरातुन हजारोच्या संख्येने धावपटू सहभागी होतात . याचे एक सन्मान म्हणून सिग्माथॉन टीम तर्फे डॉ.उन्मेष टाकळकर, डॉ .मनीषा टाकळकर, . प्रमुख अतिथी डॉ. उज्वला दहिफळे, डॉ प्रफुल्ल जटाळे , श्री मधुकर जाधव श्री शेख रफी यांच्या हस्ते धावपटूनच सत्कार करण्यात आला होते .


धावपटू श्री .भाऊसाहेच गवळी, श्री बालाजी नारागुडे,श्री. सुधीर कुलकर्णी,श्री. सतीश यादव ,श्री. उदय देशपांडे,श्री पंडित सोन्ने,श्री. तुषार प्रधान, श्री. प्रशांत राऊत. त्यासोबत एवरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारे यांचे देखील सत्कार करण्यात आला., त्यामध्ये श्री. रफिक शेख, डॉ. चारुशिला देशमुख, डॉ. विकास देशमुख, डॉ सुनील देशमुख ,शिवाजी मनगटे,श्री. शिरीष तांबे,रवींद्र रहाटगावकर,सौ. पद्मा तापेडिया, सौ. किरण भट्ट, , श्री मिलिंद संगविहार ,श्री.सचिन देशमुख, सौ. सेनाली इंगळे, सौ. निरुपमा नागोरी , नरेश गाडेकर, मधुकर राशिनकर, डॉ बदर दायमा , डॉ कलीम शेख , डॉ. शिवाजी पोळे, डॉ, संगीता देशपांडे यांचा समावेश होता.


विजेत्या धावपटूंचा सत्कार करताना सिग्मा हॉस्पिटलचे संचालक डॉ उन्मेष टाकळकर , डॉ उज्वला दहिफळे ,डॉ प्रफ्फुल जटाळे , डॉ विकास देशमुख व धावपटू आदींची उपस्थिती होती.



