नांदेड| लोकसभा पोट निवडणूक तथा 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आज इतर मतदान अधिकारी यांचे नागार्जुना पब्लिक स्कुलमध्ये दुसऱ्या दिवशीचे प्रशिक्षण आयोजित केले होते. प्रशिक्षण कक्षाच्यावतीने एकूण दहा कक्षात पीपीटी द्वारे मर्यादित गटास परिणामकारक प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. याचा प्रत्यक्ष अनुभव जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतला.



जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रत्येक कक्षात जावून स्वतः प्रशिक्षणार्थी होवून प्रशिक्षणाचा अनुभव घेतल्यामुळे इतर प्रशिक्षणार्थींचा उत्साह द्विगुणित झाला. प्रशिक्षण देणाऱ्या मास्टर ट्रेनरला कांही शंका विचारुन शंकेचे समाधान करुन घेतले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत याच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ , तहसीलदार प्रविण पांडे, नायब तहसीलदार नितेश कुमार बोलेलू, प्रशिक्षण टिममधील संजय भालके, मुख्याध्यापक सुनील दाचावार, प्रा.राजेश कुलकर्णी, हनुमंत राठोड, पेशकार राजकुमार कोटुरवार यांची उपस्थिती होती.




