Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Close these toll booths : बंद करा हे टोलनाके आणि टोलगुंडागर्दी..!
नांदेड मुंबई लेख September 22, 2025

Close these toll booths : बंद करा हे टोलनाके आणि टोलगुंडागर्दी..!

NNL TeamBy NNL TeamSeptember 22, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

टोलनाक्यावर होणारी गुंडागर्दी ही नवीन नाही. त्यात घट नाही तर वाढ होत चालली आहे. आता पत्रकारांनाही या टोलगुंडागर्दीचा सामना करावा लागत आहे. याचा राज्यकर्त्यांनी अत्यंत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, नसता लोकशाहीचा हा चौथा स्तंभ धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.

थोडीशी गुंतवणूक करुन जनतेला अनेक वर्ष हजारो पटीत लुटण्याचा सरकारी परवाना ज्यांना मिळतो ते मस्तीला येणारच. टोलवसुलीसाठी ते आपल्या पदरी गुंडांना बाळगणारच. शेवटी पैसा बोलता है. पैसे वसुली करीत असतांना अरेरावी करणे, उद्धट बोलणे, दादागिरी करणे, अंगावर धावून येणे, मारहाण करणे असे प्रकार रोज कुठे ना कुठे टोलनाक्यावर घडत असतात. त्यात सामान्य जणांबरोबर कर्मचारी, अधिकारी, पुढारी, व्यापारी, शेतकरी आणि पत्रकारही भरडल्या जात असतील तर सरकार हे टोलनाके का बंद करीत नाहीत ? टोलधाडीच्या या वाढत जाणाऱ्या गुंडगिरीसमोर सरकार गुडघे का टेकत आहे ?
परवा नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरील टोलनाक्यावर कांही पत्रकारांना गंभीर स्वरुपाची मारहाण झाली. याचा निषेध करावा तितके थोडे आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर उघडपणे झालेला हा गंभीर स्वरुपाचा हल्ला आहे. याची सरकारने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.

टोलनाक्यावरील या गुंडागर्दीत पत्रकार किरण ताजणे यांना मारहाण झाली. त्यात त्यांना गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या असून त्यांच्या सोबत असलेल्या दोन सहकाऱ्यांनाही बेदम मारहाण झाली आहे. धरा, पकडा, ठोका, हाणा, मारा, जिवंत सोडू नका अशा गर्जना करीत टोलनाक्यावरील गुंड अरदांड कर्मचाऱ्यांनी आपली भ्याड मर्दुमकी दाखविली. केंद्र व राज्य सरकार असमर्थ आहे काय ? विकास कामे करण्याची सरकारमध्ये ताकत नाही काय ? नसेल ताकत तर गप्प बसा. सरकार जवळ पैसा नसेल तर नुसत्या विकासाच्या गप्पा मारु नका. अशा गुंड टोलधाडीचा विकास आम्हाला नको आहे. हा विकास नाही जनतेला लुटण्याचा आधुनिक प्रकार आहे. तो बंद झाला पाहिजे.

रस्ते आणि पुल बांधण्यासाठी खाजगी लोकांना काम द्यायचे आणि त्याला अनेक वर्ष जनतेला लुटायचा परवाना देऊन टाकायचा. ही कुठली विकास नीती आहे..? त्याने जर त्या कामावर शंभर कोटी रुपये खर्च केले तर त्याला हजार कोटी रुपये वसूल करण्याचा परवाना द्यायचा. याला सरकार विकास म्हणत असेल तर हा विकास नसून जनतेला लुटण्याचा सरकारी कार्यक्रम आहे. सरकारचा हा गोरखधंदा तात्काळ बंद झाला पाहिजे.

सरकार एकीकडे लाडक्या बहिणींना दरमहा करोडो रुपये फुकट वाटत आहे आणि तिजोरीत पैसा नाही म्हणून गुत्तेदारांना कामे देऊन टालनाके उभारुन जनतेला लुटण्याचे परवाने देत आहे. ही सरेआम सरकारची बदमाशी दिसून येत आहे. “आओ चोरों बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा !” असेच जर सरकारचे धनदांडग्या गुत्तेदारांना आणखी धनदांडगे बनविण्याचे व सर्वसामान्य जनतेला नागवण्याचे धोरण असेल तर जनतेने सरकारच्या या टोलनीतीच्या विरोधात एल्गार पुकारला पाहिजे ! टोलनाक्यांच्या विरोधात व्यापक जन आंदोलन उभारले पाहिजे.

आंदोलन करणाऱ्या जनतेच्या कमरेत उडून लाथ मारणाऱ्या जालनाचे पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णीच्या विरोधात गृह विभाग व सरकारने कोणती कारवाई केली ? मुंबईतील विधान भवनाच्या कॅन्टीन मधील कर्मचाऱ्यास आ. संजय गायकवाड यांनी मारहाण केली त्यांच्या विरोधात सरकारने काय कारवाई केली ? ख्रिश्चन धर्म गुरुंचा सैराट करा असे म्हणणाऱ्या आ. गोपीचंद पडळकर यांना सरकारने आवर घातला काय ? सरकारने हे वेळीच केले नसल्याने आज तोच आमदार जयंत पाटलांच्या बापावर संशय घेतो ! ही एवढी मजल मारण्याची हिंमत यांना कोण देतो ?

शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंच्या या महाराष्ट्र राज्यात कायदा चालतोय की गुंडांचा गुंडाराज ? टोल वसुलीच्या नावाखाली लोकांची लूट करणाऱ्या या टोलधाडींना एवढे बळ कुठून येते ? कोणत्या शक्ती यांच्या पाठीशी असतात ? कोणता राजकीय पक्ष यांना आधार देतो ? कोणती पोलिस यंत्रणा यांना अभय देते ? ज्यामुळे हे पत्रकारांनाही सोडत नाहीत. पत्रकारही यांना कस्पटासमान वाटणार ! सामान्य नागरिक तर रोजच रक्तबंबाळ होतात पण आता पत्रकारही यांच्या निशाण्यावर आले आहेत. राज्यात हे जे होत आहे ते योग्य नाही होत देवाभाऊ ! बघा, वेळीच सावरा !! तुमची मिस्टर क्लीनची प्रतिमा खराब होऊ देऊ नका. उद्याचे भारताचे प्रधान मंत्री म्हणून लोक तुमच्याकडे आशेने पाहत आहेत. एकदा महाराष्ट्रातले पत्रकार बिघडले तर मग तुम्हाला नागपूरची रेशीमबाग ही सावरु शकणार नाही. पत्रकारांना योग्य ते संरक्षण द्या. राज्यातील गुंडपुंड टोलधाडींना वेळीच आवर घाला. नव्हे ही टोलधाड बंदच करुन टाका. काय द्यायचे ते एकदाच देऊन टाका या टोलचालकांना. यासाठी जनतेला रोज त्रास देऊ नका.

कुठे आहे पत्रकार संरक्षण कायदा ? तो फक्त कागदोपत्रीच आहे काय ? त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी करणार ? राज्यातील पत्रकारांना संपूर्ण संरक्षण कधी मिळणार ? पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांवर अशी कडक कारवाई झाली पाहिजे की पुन्हा कुणी पत्रकारांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही. कुणीही उठसूठ पत्रकारांना धमकावण्यात धन्यता मानत असेल, बेधडकपणे पत्रकारांवर हल्ला करीत असेल तर राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे हे लक्षण आहे. याची वेळीच दक्षता घ्या देवाभाऊ ! डोक्यावरुन ओघळ जात आहे. सर्व अंग भिजण्याची वाट पाहू नका.

देवाभाऊ, आज तुमचे जबाबदार बिनानावाचे बॅनर राज्यात सगळीकडे झळकत आहेत. सरकारी खर्चाने नुसते शिवाजी महाराजांना अभिवादन केल्याने शिवशाही साकारत नाही तर गुंडगिरीला आवर घाला. नुसती टोलवाटोलवी नको. टोलनाक्यावरील टोलधाडीला आवर घाला. बंद करुन टाका ही टोलनीती ! राज्यातील जनतेची ही टोलदुखी कायमची बंद करुन टाका. वाटल्यास यासाठी लाडक्या बहिणींची राज्याला बरबाद करणारी लोकप्रिय योजना कायमची बंद करुन टाका. किती दिवस दात कोरुन पोट भरणार ? सामाजिक न्याय विभागाचा व विविध महामंडळांचा पैसा लाडक्या बहिणींकडे वळविला जात आहे. हे योग्य नाही. हा रोष सरकारला महाग पडू शकतो. त्यात पुन्हा पत्रकारांचा रोष म्हणजे हे राज्य टिकेल काय ? पुरोगामी म्हणून महाराष्ट्राची एक वेगळीच प्रतिमा आहे, या प्रतिमेला मलिन होऊ देऊ नका देवाभाऊ..!

.. इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, संस्थापक, अ. भा. पत्रकार समता परिषद, मो. 855 499 53 20

and toll goons..! Close these toll booths
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleRamtirth police action : रामतीर्थ पोलिसांची कारवाई; रेशन गव्हाचा संशयित आयशर जप्त
Next Article Mata Kalinka temple : उदो… उदो…च्या गजरात माता कालिंका मंदिरात घटस्थापना
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nanded Godavari river floods : नांदेड गोदावरी नदीला महापुर मनपाच्या अगन्नीशामक दल ठरला देवदूत,जवळपास ५० जणांची केली सुटका -NNL

September 4, 2024

former MLA Pradeep Naik : माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या होर्डींग समोर ग्रामीण भागातील नागरीकांचा फोटो घेण्यासाठी आग्रह -NNL

September 25, 2024

Chief Executive Officer Meenal Karanwal : जिल्हा परिषद शाळांच्या मालकीच्या नोंदींसाठी विशेष मोहीम

March 14, 2025

The kind-hearted king of the world of friendship: Vijay Joshi : मैत्रीच्या दुनियेचा दिलदार राजा: विजय जोशी

March 22, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Swaramegh Music Culture : स्वरमेघ म्युझिक कल्चर प्रस्तुत स्वरसम्राज्ञी भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना संगीतमय श्रद्धांजली

The media should give balanced justice : माध्यमांनी सर्व उमेदवारांना समतोल न्याय द्यावा – राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीनी व्यक्त केली अपेक्षा -NNL

Gopujan : पोखरभोसी येथील श्रीकृष्ण गोशाळेच्या वतीने गोपुजन

School : डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूलचे अनधिकृत स्थलांतर ?

A fight to preserve the religious reformist tradition : धार्मिक सुधारणावादी परंपरेच्या संरक्षणाचा लढा -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?