Gopujan : पोखरभोसी येथील श्रीकृष्ण गोशाळेच्या वतीने गोपुजन

IMG 20250913 WA0038 Gopujan : पोखरभोसी येथील श्रीकृष्ण गोशाळेच्या वतीने गोपुजन

उस्माननगर | मातृभूमी सेवा संघ गोसेवा व श्रीकृष्ण गोशाळा पोखरभोसी च्या वतीने ब्राईट शायनिंग स्टार्स प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये गोपूजन व गोदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

प्रथम सर्वांनी फुलांचा वर्षाव करून गोमातेचे स्वागत केले. चिमुकल्यांनी “गोमाता की जय”अश्या घोषणा देत फुले उधळून आनंद व्यक्त केला.लगेच सौ.पितळे मॅडम व उपस्थितांचे हस्ते गोपुजन करण्यात आले.

“छोटी छोटी गैया,छोटे छोटे ग्वाल,छोटेसे मेरे,मदन गोपाल” असे म्हणत लहान बाळांनी ठेका धरत गोमाता भोवती फेर धरला होता.गाईंच्या दूधाचे महत्त्व तसेच विषमुक्त अन्नासाठी गाय किती आवश्यक आहे असे सांगून चिमुकल्यांना गोमातेची ओळख करून देण्यात आली.कवी प्रल्हाद घोरबांड यांची गाय ही कविता “बाबा,बाबा….एक गाय आना घरात, लहान वासरासंगे खेळेल मी दारात ……..” सामूहिकपणे गाण्यात आली.

IMG 20250913 WA0037 Gopujan : पोखरभोसी येथील श्रीकृष्ण गोशाळेच्या वतीने गोपुजन

यावेळी शिवाजी नागेश्वर, मोहनजी चौहान, नारायण वासमवाड, संजय पवार, ओंकार चौहान, रामदास पांडे, बाबाराव शिंदे, हरप्रकाश सिंघ, विनोद मालू,प्रल्हाद घोरबांड व परिसरातील बंधू-भगिनी, पालक यांची उपस्थिती होती. सर्व मुलांना टीका लावून बिस्कीट वाटप करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विनोद मालू यांनी उपस्थितांचे व शाळेच्या संचालिका सौ. दीपमाला सुरवसे यांचे आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top