Saturday, June 27

Tag: Gopujan on behalf of Shri Krishna Goshala

Gopujan : पोखरभोसी येथील श्रीकृष्ण गोशाळेच्या वतीने गोपुजन

Gopujan : पोखरभोसी येथील श्रीकृष्ण गोशाळेच्या वतीने गोपुजन

कृषी, नांदेड
उस्माननगर | मातृभूमी सेवा संघ गोसेवा व श्रीकृष्ण गोशाळा पोखरभोसी च्या वतीने ब्राईट शायनिंग स्टार्स प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये गोपूजन व गोदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रथम सर्वांनी फुलांचा वर्षाव करून गोमातेचे स्वागत केले. चिमुकल्यांनी "गोमाता की जय"अश्या घोषणा देत फुले उधळून आनंद व्यक्त केला.लगेच सौ.पितळे मॅडम व उपस्थितांचे हस्ते गोपुजन करण्यात आले. "छोटी छोटी गैया,छोटे छोटे ग्वाल,छोटेसे मेरे,मदन गोपाल" असे म्हणत लहान बाळांनी ठेका धरत गोमाता भोवती फेर धरला होता.गाईंच्या दूधाचे महत्त्व तसेच विषमुक्त अन्नासाठी गाय किती आवश्यक आहे असे सांगून चिमुकल्यांना गोमातेची ओळख करून देण्यात आली.कवी प्रल्हाद घोरबांड यांची गाय ही कविता "बाबा,बाबा....एक गाय आना घरात, लहान वासरासंगे खेळेल मी दारात ........" सामूहिकपणे गाण्यात आली. यावेळी शिवाजी नागेश्वर, मोहनजी चौहान, नारायण वासमवाड,...
error: Content is protected !!