नांदेड l सीटू संलग्न मजदूर युनियनचे सभासदत्व स्वीकारलेल्या नागरी आरोग्य वर्धनी केंद्रातील परिचर व सफाई कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती देशमुख यांच्या स्वाक्षरीने कार्यमुक्त करण्याचे पत्र काढण्यात आले होते. संबंधित बाह्य संस्थेचे कंत्राट संपल्यामुळे कार्यमुक्त करण्याचे आदेशात नमूद आहे. परंतु मागील ७ महिन्याचे मानधन थकीत असल्यामुळे सदरील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.


कामगार कायद्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांना रोजनंदारी वेतणावर रुजू करण्यात यावे व मागील वेतन तात्काळ अदा करण्यात यावे अशी मागणी सीटू कामगार संघटनेच्या वतीने दि, ८ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड श्रीमती मेघना कावली यांच्याकडे प्रत्यक्षात भेटून करण्यात आली आहे.


यावेळी चर्चा करण्यात आली असून सीईओ कावली यांनी कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. सर्वांना रुजू करून घेण्याची सीफारस नवीन बाह्य संस्थेकडे करणार असल्याचे तोंडी आश्वासन शिष्टमंडळास दिले.


या शिष्टमंडळात सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, कर्मचारी तथा संघटनेचे शाखा पदाधिकारी आत्माराम राजगोरे पाटील,सुरेश सूर्यवंशी व इतर कर्मचारी सहभागी होते. यावेळी जिल्हा परिषद येथे सहदेव सूर्यवंशी, प्रकाश सरोदे, शिवलिंग गायकवाड, विनोद चव्हाण, विशाल जांभळीकर, संकल्प सोनकांबळे, दिगंबर पुपुलवाड, सचिन वाघमारे, यशोदीप कुंभारे यांच्यासह इतर ३०-३५ कर्मचारी उपस्थित होते.

-कॉ.गंगाधर गायकवाड,
जनरल सेक्रेटरी CITU नांदेड जिल्हा कमिटी.
मो. 7709217188
दिनांक -8 सप्टेंबर 2025
बातमी प्रसिद्धीस द्यावी ही विनंती.


