CITU ; सीटूच्या शिष्टमंडळाने सीईओ मेघना कावली यांची घेतली भेट ; कार्यमुक्त केलेल्या ४० कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्याचे दिले आश्वासन
नांदेड l सीटू संलग्न मजदूर युनियनचे सभासदत्व स्वीकारलेल्या नागरी आरोग्य वर्धनी केंद्रातील परिचर व सफाई कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती देशमुख यांच्या स्वाक्षरीने कार्यमुक्त करण्याचे पत्र काढण्यात आले होते. संबंधित बाह्य संस्थेचे कंत्राट संपल्यामुळे कार्यमुक्त करण्याचे आदेशात नमूद आहे. परंतु मागील ७ महिन्याचे मानधन थकीत असल्यामुळे सदरील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कामगार कायद्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांना रोजनंदारी वेतणावर रुजू करण्यात यावे व मागील वेतन तात्काळ अदा करण्यात यावे अशी मागणी सीटू कामगार संघटनेच्या वतीने दि, ८ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड श्रीमती मेघना कावली यांच्याकडे प्रत्यक्षात भेटून करण्यात आली आहे.
यावेळी चर्चा करण्यात आली असून सीईओ कावली यांनी कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार...
