Kinwat Municipal Council | किनवट नगरपरिषदेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मदत कक्ष स्थापन करून मार्गदर्शन शिबीर – NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| शुक्रवार रोजी किनवट नगर परिषदेच्या वतिने नगर परिषद कार्यालयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात फॉर्म भरण्यासाठी मदत कक्ष स्थापन करून शिबीर घेण्यात आले.


तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कशाप्रकारे फॉर्म भरावे व या योजनेचे लाभार्थीसाठी पात्र व अपात्र नियम व अटी शासन निर्णयानुसार आणि लाडकी बहिणीने याचा लाभ घ्यावा या योजने बद्दल सर्व माहिती शिबीरात मुख्याधिकारी मुगाजी काकडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी या शिबिरात सूत्रसंचालन स्टॅलिन आडे यांनी केले असून कार्यलीन अधीक्षक अर्चना भिसे
पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता अशोक भालेराव, राजु पिल्लेवार, विजया वाघमारे,लेखापाल अनिल बिराजदार,अब्दुल अल्ताफ, यांनी योजने बद्दल माहिती देऊन लाभ घेण्यासाठी आलेले बहिणीचे फॉर्म भरून घेतले आणि ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म भरता येतो.


किंवा नगर परिषद कडून 1) नगर परिषद कार्यालय व 2) नेहरू वाचनालय या दोन ठिकाणी मदत कक्ष स्थापन करण्यात आले असून येथे फॉर्म भरावी. आता पर्यंत ऑनलाईन पद्धतीने 615 फॉर्म योजनेचे या कार्यालयात सादर झाले असून या शिबिरास भरपूर प्रमाणात महिला हजर होते आणि या योजनेचा भरपूर प्रमाणात लाभ घ्यावी असे सूचना मुख्याधिकारी यांनी दिले.




