नांदेड। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम जाहीर करण्यात आला या काळात विशेष मोहीम राबवून कामे पूर्ण करावी असे सूचना दिलेल्या आहेत.या विषयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नियोजनाने जिल्ह्यात कुटुंब कल्याण कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवल्या जात आहे.


समाजातील प्रत्येक व्यक्तीने वाढत्या लोकसंख्येकडे लक्ष दिले पाहिजे आणि लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यात आपली भूमिका पार पाडली. पाहिजे. लोकसंख्या स्फोट ही एक गंभीर चिंता आहे.वाढत्या लोकसंख्येला प्रतिबंध करण्यापासून ते नैसर्गिक स्रोतांचा योग्य वापरापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते गर्भवतीच्या अन आरोग्य आणि त्याचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे.

यामागे प्रजनन विषयक आरोग्याच्या समस्या हे प्रमुख कारण आहे.प्रजनन विषयक आरोग्य वाढ करणे प्रजनन विषयक आरोग्यसेवांची सार्वत्रिक उपलब्ध म्हणून आणि समाजातील जास्तीत जास्त कुटुंब छोटी आणि आरोग्यपूर्ण असावीत आणि लोकांना शाश्वत भवितव्य मिळावे लोकसंख्या वाढीचा दर घटवून सामाजिक दारिद्र्य कमी करण्यासाठी काही पावले उचलणे अनिवार्य आहे. याचाच भाग म्हणून नांदेड जिल्ह्यात कल्याण कार्यक्रम राबवल्या जात आहे. मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रम अनुषंगाने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न आरोग्य विभाग करत आहे.

व्याख्या :- कुटुंब नियोजन कार्यक्रम म्हणजे कुटुंबाच्या वाढीबाबत नियोजन करणे. उद्देश – नागरिकांना कुटुंब नियोजनासाठी प्रोत्साहन देणे, नागरिकांना कुटुंब नियोजनाची साधने तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध करून देणे.

कार्यक्रमाचे अंतर्गत मिळणाऱ्या आरोग्य सेवा सुविधा 1) कुटुंब नियोजनासाठी पुरुष शस्त्रक्रिया व स्त्री शस्त्रक्रिया. 2) कुटुंब नियोजनाच्या तात्पुरत्या पद्धतीमध्ये तांबी गर्भ व निरोधक गोळ्या व निरोगी याचा वापर करण्यासाठी नागरिकांना जागृत करणे व त्या सेवा सुविधा पुरवणे. 3) इंजेक्टेबल डिम्पा( डी एम पी ए )या प्रोजेस्ट्रोजन संप्रेरकाचा समावेश असलेले गर्भनिरोधक इंजेक्शन महिलांना देणे.
शस्त्रक्रिया नंतर लाभार्थ्यांना मिळत असलेला लाभ
– एससी एसटी बीपीएल धारक लाभार्थ्यांना – 600 रुपये, सर्वसाधारण लाभार्थ्यांना -250 रुपये, एन एस व्ही.झालेल्या पुरुषांना (नसबंदी) –1451 रुपये अनुदान मिळते. नांदेड जिल्ह्यात एप्रिल 2024 ते डिसेंबर पर्यंत एकूण स्त्री शस्त्रक्रिया 10487 एकूण पुरुष नसबंदी nsv–11 झालेल्या आहेत. पुरुषांच्या मानाने स्त्रीशस्त्रक्रियांची संख्या अव्वल आहे.
कुटुंब नियोजनाच्या कायमस्वरूपी व तात्पुरत्या पद्धतीचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. आणि या सुविधा मिळवण्यासाठी आयुष्यमान आरोग्य मंदिर,ग्रामीण रुग्णालय,जिल्हा रुग्णालय या शासकीय संस्थांशी संपर्क साधावा असे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य सेविका,अशा सेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा.