किनवट, परमेश्वर पेशवे| राज्य परिवहन महामंडळाच्या किनवट आगारात “प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन” साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक संभाजी शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड विभाग नियंत्रक चंद्रकांत वडस्कर, तालुका सचिव बालाजी सिरसाट, पत्रकार गोकुळ भवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्य परिवहन महामंडळाच्या किनवट आगारात प्रवासी व कामगाराच्या समस्या, तक्रारी, सूचना यांचा स्थानिक पातळीवर जलद गतीने निपटारा करण्यासाठी आगारनिहाय ‘प्रवासी राजा दिन’ व ‘कामगार पालक दिन’ आयोजित करण्यात आला होता. तर बस सेवेबद्दल पत्रकार परिषदेच्या वतीने बालाजी सिरसाट किनवट तालुक्यातील बस सेवा सुरळीत करणे,नवीन गाड्याची मागणी करणे किनवट नांदेड किनवट ते शेगाव जाणारी बस नियमित चालू करणे विद्यार्थ्यांसाठी मानव विकास अंतर्गत चालणाऱ्या गाड्याही शाळेच्या वेळापत्रकानुसार वेळेवर मार्गस्थ करणे इत्यादी समस्या उपस्थित केल्या.
गजानन महाराज संस्थांच्या वतीने किनवट शेगाव मार्ग गाडी नियमित चालवण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले तर अन्य प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या सेवेबद्दल नाराजी व्यक्त करत विभाग नियंत्रक चंद्रकांत वडस्कर यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. विभाग नियंत्रक चंद्रकांत वडस्कर यांनी प्रवाशांच्या लेखी तक्रारी तसेच त्यावरील उपाययोजनांबाबत संबंधितांना आदेश देऊन सर्व समस्या सोडवण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.दुपारच्या सत्रात आगारात ३ ते ५ या वेळेमध्ये आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत अथवा संघटनात्मक समस्या ऐकूण घेऊन त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असेही ते म्हणाले.
यावेळी संतोष चनमनवार, प्रशांत कोरडे, प्रा.विश्वास कोल्हारीकर सहाय्यक वाहतूक अधीक्षक शिलरत्न ढगे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक यशवंत खिलारे, वाहतूक निरीक्षक साईनाथ मुंडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक गंगाय्या सटलावार वरिष्ठ लिपिक सुधीर डुबेवार यांच्यासह प्रवासी राज्य परिवहन महामंडळातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहतूक नियंत्रक किरण नेम्मानिवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार वाहतूक लिपिक डवरे यांनी मानले.