Celebrate “Traveller King Day and Worker’s Parents Day” at Kinwat : किनवट येथे “प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन”साजरा – NNL
किनवट, परमेश्वर पेशवे| राज्य परिवहन महामंडळाच्या किनवट आगारात "प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन" साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक संभाजी शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड विभाग नियंत्रक चंद्रकांत वडस्कर, तालुका सचिव बालाजी सिरसाट, पत्रकार गोकुळ भवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्य परिवहन महामंडळाच्या किनवट आगारात प्रवासी व कामगाराच्या समस्या, तक्रारी, सूचना यांचा स्थानिक पातळीवर जलद गतीने निपटारा करण्यासाठी आगारनिहाय 'प्रवासी राजा दिन' व 'कामगार पालक दिन' आयोजित करण्यात आला होता. तर बस सेवेबद्दल पत्रकार परिषदेच्या वतीने बालाजी सिरसाट किनवट तालुक्यातील बस सेवा सुरळीत करणे,नवीन गाड्याची मागणी करणे किनवट नांदेड किनवट ते शेगाव जाणारी बस नियमित चालू करणे विद्यार्थ्यांसाठी मानव विकास अंतर्गत चालणाऱ्या गाड्याही शाळेच्या वेळापत्रकानुसार वेळेवर मार्गस्थ करणे इ...
