Monday, July 13

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Heavy rains in Nanded district; Warning to citizens : नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा -NNL

Heavy rains in Nanded district; Warning to citizens : नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा -NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थितीवर लक्ष ठेवून असून ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आवश्यक साधनसामुग्रीसह तैणात राहण्याची सूचना बचाव पथकांना केली आहे. नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे अतिवृष्टी संदर्भात आवाहन : पाऊस थांबताच नुकसानाचे पंचनामे होतील. नागरिकांनी सतर्क असावे. पुलावरून पाणी वाहत असताना रस्ते ओलांडू नये. धोकादायक ठिकाणी जाऊ नये. जिल्हा प्रशासनाचे नुकसाना संदर्भात लक्ष असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले. काल सकाळी दहा वाजता पासून रविवारी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील 63 मंडळांपैकी 26 मंडळांमध्ये 65 मिली लिटर पेक्षा अधिक पाऊस झाल...
The Sahastrakund scenic waterfall : तरुणाईला आकर्षित करणारा सहस्त्रकुंड निसर्गरम्य धबधबा ओसंडून वाहू लागला -NNL

The Sahastrakund scenic waterfall : तरुणाईला आकर्षित करणारा सहस्त्रकुंड निसर्गरम्य धबधबा ओसंडून वाहू लागला -NNL

नांदेड, देश विदेश, महाराष्ट्र, व्हिडीओ, हिंगोली
किनवट, परमेश्वर पेशवे| मराठवाड्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेले एकमेव पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे सहस्रकुंड धबधब्याची ओळख असून नांदेड जिल्हातील किनवट तालुक्याच्या निसर्गाच्या कुशीत उदयास आलेलं इस्लापूर गावापासून अगदी चार किलोमिटर अंतरावर असलेला सहस्त्रकुंडचा धबधबा काल संध्याकाळ पासून सतत झालेल्या पावसामुळे ओसंडून वाहत असताना पाहाव्यास मिळत आहे. या निसर्गकारी, रोमांचकारी अनुभूतीमुळे तरुणाईचे आकर्षण वाढले आहे, अनेक पर्यटक सहस्त्रकुंडचा अद् भूत नजारा पाहण्यासाठी सहस्त्रकुंडकडे धाव घेवू लागले. नांदेड जिल्हयात काल संध्याकाळपासून सतत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे नदी - नाले ओसडून वाहत आहेत सहस्त्रकुंड धबधब्यातही मोठे पाणी आले असल्याने हा धबधबा अगदी खळवळून मोठया दिमाखाने ओसांडून वाहतो आहे. हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी विदर्भ आणि आंध्र प्रदेशातील पर्यटक येथे ...
Heavy rain shivani/apparaopeth ; शिवणी/अप्पारावपेठ परिसरात पावसाचा जोर कायम; शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान -NNL

Heavy rain shivani/apparaopeth ; शिवणी/अप्पारावपेठ परिसरात पावसाचा जोर कायम; शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
शिवणी, भोजराज देशमुख। काल शनिवार सायंकाळ पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील शिवणी अप्पारावपेठ परिसरात पडलेल्या पावसामुळे अनेक गावांना जोडणाऱ्या पुलावरून पावसाच्या पुराचे पाणी गेल्याने या परिसरातील अनेक गावांचा सकाळच्या दरम्यान संपर्क तुटला होता. शिवणी,अप्पारावपेठ,इस्लापूरया गावात अनेक महामंडळ व तेलंगणा बसेस जिथल्या तिथे थांबून गेले होते.गावाजवळच्या नालल्या आलेल्या पुरामुळे गावाचे संपर्क तुटले आहे.तर शिवणीसह अप्पारावपेठ परिसरात विविध भागात आलेल्या नाल्याच्या पुराच्या पाण्यामुळे अनेक शेतीमध्ये पाणी घुसून शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.तालुका प्रशासनाने याची तात्काळ नोंद घेऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. आगस्ट महिन्यात थांबलेला पाऊस सप्टेंबर महिना लागताच ऍक्टिव्ह मोड वर आला ...
In Sibdara village, there is sadness on Bullopola festival : सिबदरा गावात बैलपोळा सणावर दुःखाचं सावट; विजेचा शॉक लागून बैल दगावला -NNL

In Sibdara village, there is sadness on Bullopola festival : सिबदरा गावात बैलपोळा सणावर दुःखाचं सावट; विजेचा शॉक लागून बैल दगावला -NNL

नांदेड, कृषी
हिमायतनगर। तालुक्यातील मौजे सिबदरा येथील शेतकरी गुरुदास सायन्ना घोसलवाड हे कापसाची वखरणी करत असतांना त्यांच्या शेतात असलेल्या महावितरण कंपनीच्या खांबाच्या तणावातुन  उतरलेल्या वीजेचा धक्का एका बैलास लागून दगावल्याची दुर्दैवी घटना बैलपोळा सणाच्या दोन दिवस पूर्वी घडली आहे. या घटनेमुळे सीबदरा गावावर दुःखच सावट पसरलं आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे सीबदरा येथील शेतकरी आपल्या शेतातील कापसाच्या पिकाची तण जास्त झाल्याने वखरणी करीत होता. दरम्यान पाऊस सुरू झाला आणि शेतात असलेल्या वीज खांबाच्या तणावाला बैलाचा धक्का लागला. अचानक तणावाच्या तारातून विज उतरल्याने शेतात ओताच्या बैलाला शॉक लागल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला. आगोदरच बळीराजा कर्जाच्या डोंगरात बुडालेला असताना यंदाच्या खरीप हंगामात उत्पादन चांगल मिळेल व डोक्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर कमी ह...
बाहेरगावाहून आलेल्या एसटीतील महिला प्रवाशांना धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी शंभर छत्र्या दिल्या -NNL

बाहेरगावाहून आलेल्या एसटीतील महिला प्रवाशांना धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी शंभर छत्र्या दिल्या -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। रविवारी सकाळपासूनच नांदेड शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्याची कल्पना नसल्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या एसटीतील महिला प्रवाशांना धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी शंभर छत्र्या दिल्या असून अनपेक्षितपणे मोफत छत्र्या मिळाल्याचे पाहून भिजणाऱ्या महिलांनी समाधान व्यक्त केले. पावसात सर्वजण आराम करत असताना दिलीप ठाकूर यांनी समाजसेवेचा वसा सुरू ठेवत संतोष भारती यांच्यासोबत बसस्थानक गाठले. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नांदेड बस स्थानकावर एसटीतून उतरलेल्या महिला प्रवाशांची तारांबळ उडत होती. सोबत असलेल्या लहान मुलांना भिजण्यापासून वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न महिला करत होत्या. स्वतः जवळचे सामान घेऊन पावसात चालणे त्यांना अवघड होत होते. अशा परिस्थितीत दिलीप ठाकूर हे सर्वांना छत्री देत होते. अनोळखी व्यक्तीकडून छत्री घेण्यास काही भगिनी संकोच करीत होत्या. परंतु दिलीप ठाकूर यांनी त्यांना एका भावाक...
Bariyamsingh Nawab passed away ; बरियामसिंघ नवाब यांचे निधन -NNL

Bariyamsingh Nawab passed away ; बरियामसिंघ नवाब यांचे निधन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य व माजी नगरसेवक स. बरियामसिंघ राजासिंघ नवाब यांचे छत्रपति संभाजी नगर येथे रविवार, दि. 1 सेप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान निधन झाले. ते माजी नगर सेवक स. गुरमीतसिंघ नवाब (डिंपल सिंग), सामाजिक कार्यकर्ता स. बलबीरसिंघ नवाब आणि गुलबीरसिंघ नवाब यांचे वडील होत. शेवटच्या क्षणी त्यांचे वय 77 वर्षें होते. मागील काही दिवसापासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर कमलनयन बजाज हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. त्यांच्या निधानाने शीख समाजात शोक व्याप्त झाले आहे. त्यांनी अनेक वर्षें गुरुद्वारा बोर्ड सदस्य आणि व्यवस्थापन समिति सदस्य म्हणून काम पाहिले. ते बिदर येथील गुरुद्वारा नानक झिरा साहेब ट्रस्ट मध्ये ही आजीवन सदस्य तथा गवरनिंग कौंसिलचे सदस्य होते. त्यांच्या मागे कुटुंबात तीन मुलं, सात मुलीं, सुनं, नाटवंड, जवाई, नात असा मोठा परिवार शोकाकुल झाला आहे. उद्या सोमवारी सकाळी ...
Mahur heavy rain ; माहूर तालुक्यात पावसाचा हाहाकार! घरे,रस्ता पाण्याखाली; गोर गरीबांचा संसार उघड्यावर -NNL

Mahur heavy rain ; माहूर तालुक्यात पावसाचा हाहाकार! घरे,रस्ता पाण्याखाली; गोर गरीबांचा संसार उघड्यावर -NNL

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। माहूर तालुक्यात पावसाने हाहाकार उडाला आहे. काल रात्र ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पैनगंगा नंदी दुथडी वाहत असल्याने वाहतूक सेवा बंद केली त्याच बरोबर नदी पाञातील पाणी अनेक गावात शेतात शिरले आहे.तर तालुक्यातील गाव खेड्यालगत असलेल्या नाल्याचे पाणी अनेक शेतता व घरात शिरल्याने अनेकांच्या संसारउपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. जोरदार झालेल्या पावसाने ग्रामिण गावातील विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे. माहूर तालुक्यात झालेल्या पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे.तालुक्यातील अनेक महत्वाची गावे पाण्याखाली गेली आहेत.तर वाई बाजार,उमरा, हरडप,अंजनखेड,नायकवाडीसह अनेक गावखेड्या मध्ये लोकाचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.तर वाई बाजार येथील नाल्याकाटच्या घरात व दुकानात पाणी शिरल्याने या पावसाचा मोठा फटका बसला आहे.येथील फुकट न...
Himayatnagar heavy rains ; हिमायतनगर शहर परिसरात रात्रभर झाला दमदार पाऊस; पहिल्याच मोठया पावसात जिकडे तिकडे पाणीच पाणी -NNL

Himayatnagar heavy rains ; हिमायतनगर शहर परिसरात रात्रभर झाला दमदार पाऊस; पहिल्याच मोठया पावसात जिकडे तिकडे पाणीच पाणी -NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार। गेल्या दोन महिन्यापासून मोठया पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या हिमायतनगर शहर व तालुका वासीयांना शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. दरम्यान रविवारी सकाळी 5 ते 7 च्या दरम्यान दमदार पावसामुळे शहरातील 4, 16, 1, 7, 13, 2 सह अनेक प्रभागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे नगरपंचायतीच्या ढिसाळ नियोजनाचे प्रचिती नागरिकांना आली असून, गुडघाभर पाणी घरात असल्याने अनेक गोरगरीब नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणा बाबत संताप व्यक्त केला आहे. तालुक्यातील अनेक गावच्या नाल्यावरून पाणी वाहू लागल्या ने काही तास संपर्क तुटला होता. दरवर्षीप्रमाणे यंदा नगरपंचायत प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नाल्याची साफसफाई केली नसल्यामुळे शनिवार 31 ऑगस्ट च्या रात्री उशिरा झालेल्...
Nanded Police raided godaun ; अवैद्य रित्या अत्यावशक वस्तु अधिनियम अंतर्गत येणारे मालाची साठवणुक; अधिकाऱ्यांना घेऊन पोलिसांनी टाकला छापा -NNL

Nanded Police raided godaun ; अवैद्य रित्या अत्यावशक वस्तु अधिनियम अंतर्गत येणारे मालाची साठवणुक; अधिकाऱ्यांना घेऊन पोलिसांनी टाकला छापा -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। ऑपेरेशन फ्लश आऊट अंतर्गत पोलीस स्टेशन कुंटूर हद्दीत गोडावून मध्ये अत्यावश्यक वस्तु अधिनियम अंतर्गत येणारे मालाची साठवणुक केल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी गोडाऊनच्या ठिकाणी नांदेड पोलिसांनी छापा मारून मोठा साठा जप्त केला आहे. ऑपेरेशन फ्लश आऊट अंतर्गत आज दिनांक 31.08.2024 रोजी पोलीस स्टेशन कुंटूर हद्दीत कुंटूर फाटा येथील गोडावून मध्ये अत्यावश्यक वस्तु अधिनियम अंतर्गत येणारे मालाची साठवणुक करून ठेवल्याची माहिती मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांना गुप्त बातमीदारमार्फत मिळाल्याने पोलीस अक्षिक्षक, नांदेड यांचे आदेशाने पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार व कुंटूर पोलीस सोबत बाल प्रकल्प अधिकारी, कार्यालय नायगाव व गट शिक्षण अधिकारी, कार्यालय नायगाव व पुरवठा अधिकारी, तहसील कार्यालय, नायगाव असे मिळुन कुंटूर फाटा येथे जावून पाहणी केली. यावेळी सदर गोडाऊन मध्ये अवैद्...
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या समवेत होणार कॉम्रेड उज्वला पडलवार यांची संस्मरणीय भेट -NNL

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या समवेत होणार कॉम्रेड उज्वला पडलवार यांची संस्मरणीय भेट -NNL

करियर, नांदेड
नांदेड। महिला सबलीकरणासाठी गेल्या अनेक वर्षापासून भरीव योगदान देणाऱ्या महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील 25 महिलांचा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असून राष्ट्रपती सोबत संस्मरणीय भेटीच्या सोहळ्यात नांदेडच्या कॉ. उज्वला पडलवार यांचा समावेश करण्यात आला आहे . दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी मुंबई येथील राजभवनात हा दिमाखदार सोहळा पार पडणार असल्याची माहिती लोकमत सखी मंचच्या वतीने देण्यात आली आहे . कष्टकरी ,शेतकरी ,आशा वर्कर, गटप्रवर्तक, घरकामगार ,असंघटित कामगार महिलांच्या न्याय हक्कासाठी गेल्या एक दशकावून अधिक काळ संघर्ष करणाऱ्या कॉम्रेड उज्वला पडलवार यांच्या कार्याची पावती म्हणून दैनिक लोकमत संखी मंचच्या वतीने महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांच्या हस्ते दिनांक 3 सप्टेंबर रोजी गौरव करण्यात येणार आहे . राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी आणि सशक्तीकरणासाठी योगदान देण...
error: Content is protected !!