Nanded ; नांदेड पंचायत समिती गणासाठी आरक्षण जाहीर
नवीन नांदेड l आगामी होणाऱ्या नांदेड पंचायत समितीसाठी आता नव्याने दोन जागा वाढल्या असून दहा जागेसाठी आता निवडणुका होणार आहेत,त्या अनुषंगाने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी साठी गणनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
यापुर्वीच पंचायत समिती नांदेड चे सभापती आरक्षण नागरीक मागास प्रवर्ग यासाठी सुटल्या आहे,अनेक गणात इच्छुकांचे स्वप्न भंगले तर काहीना खुशी तर काहींना गम झाले असून जवळपास दहा पैकी पाच जागांवर 50/टक्के महिलांना संधी मिळाली आहे.
नांदेड पंचायत समिती अंतर्गत नांदेड तालुक्यातील दहा गणांचा समावेश असुन या वेळी दोन गण वाढले आहेत त्यात धनेगाव व तुप्पा या गणांचा समावेश आहे, पंचायत समिती सभापती यावेळेस आरक्षण नागरीकांच्या मागास प्रवर्ग साठी सोडण्यात आले आहे ,तर दहा पंचायत समिती गणासाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी नांदेड कार्यालय येथे 13 ऑक्टोबर रोजी आरक्...









