नांदेडतेलंगणाधार्मिक

Gurudwara Board Meeting : अत्तापुर (हैदराबाद) येथील गुरुद्वारा सिख छावणीच्या जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी गुरुद्वारा बोर्ड सक्रिय

नांदेड | तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील अत्तापुर परिसरातील गुरुद्वारा सिख छावणीच्या जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी गुरुद्वारा बोर्डाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथील माननीय पंज प्यारे साहिबान यांनी स्पष्ट केले आहे.

१५ मार्च २०२६ रोजी अत्तापुर, हैदराबाद येथील गुरुद्वारा सिख छावणीच्या सुमारे १.५ एकर जमिनीवर प्रशासनाने जप्तीची कारवाई केली. संबंधित जमीन गुरुद्वारा साहिबची असल्याचा दावा करण्यात येत असून या प्रकरणी न्यायालयात वाद सुरू होता. न्यायालयाचा निकाल गुरुद्वारा साहिबच्या बाजूने लागल्यानंतर काही स्थानिकांनी ही जमीन मंदिराची असल्याची तक्रार प्रशासनाकडे केल्याचे समोर आले. त्यानंतर प्रशासनाने कारवाई करत १.५ एकर जमिनीतून सुमारे १००० गज जमीन गुरुद्वारा साहिबकडे ठेवून उर्वरित जमिनीवर जप्तीची कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

IMG 20260316 WA0061 scaled Gurudwara Board Meeting : अत्तापुर (हैदराबाद) येथील गुरुद्वारा सिख छावणीच्या जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी गुरुद्वारा बोर्ड सक्रिय

या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. तसेच या प्रकरणी काही शीख नागरिकांवर पोलिसांनी गुन्हेही दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर १६ मार्च २०२६ रोजी तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे माननीय पंज प्यारे साहिबान यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन हे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी शिष्टमंडळ पाठविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

दरम्यान, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. स. विजय सतबीर सिंह यांनी दूरध्वनीद्वारे या प्रकरणाची सविस्तर माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीला जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंह, हेड ग्रंथी सिंह साहिब भाई कश्मीर सिंह, धुपिया सिंह साहिब भाई राम सिंह, भाई गुरदीप सिंह, भाई रणजीत सिंह, डेप्युटी अधीक्षक स. रविंदर सिंह कपूर, सहाय्यक अधीक्षक स. बलविंदर सिंह फौजी, कमिटी विभागाचे प्रभारी स. दर्शन सिंह तसेच गुरुद्वारा बोर्डाचे विधी सल्लागार स. जसपाल सिंह सुखमनी आदी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!