गुंठेवारी संचिका व कागदपत्र इतर संबंधित विभागात सुरक्षित -NNL

नांदेड| येथील जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवनमध्‍ये असलेल्‍या ग्रामीण गुंठेवारी कक्षास 15 डिसेंबर 2022 रोजी रात्री 12.10 वाजेच्‍या दरम्‍यान अचानक आग लागली. मनपाच्या अग्निशमन दलाने ही आग विझवली आहे.

या घटनेत गुंठेवारी विभागात असलेल्‍या गुंठेवारीच्‍या संचिका तसेच निवडणुकीचे जुने नमुने असलेले रेकॉर्ड हे 5 ते 10 टक्‍के अंशत: जळाले आहे. गुंठेवारीच्‍या प्रकरणांमध्‍ये नगररचना कार्यालयाचा अभिप्राय घेण्‍यात येतो.

नगररचना विभागाचे हे अभिप्राय व प्रमाणित नकाशाच्‍या मुळ प्रती नगररचना कार्यालयात उपलब्‍ध आहेत. त्‍यामुळे अंशत: जळालेल्‍या गुंठेवारीच्‍या संचिकेची पुर्नरबांधणी होऊ शकते. त्‍यामुळे जनतेने घाबरु नये असे, आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील गुंठेवारी कक्षाचे प्राधिकृत अधिकारी यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!