क्राईमनांदेड

Nanded Police Action ; सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणारे, दारू पिणाऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून देणारेवर धडक कारवाई

नांदेड। अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, यांनी नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पथकाने अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सपोनि भागवत नागरगोजे व चार्ली पोलीस अंमलदार यांनी नांदेड शहरात दिनांक 15 मे 2025 रोजी शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करणारे व दारू पिणा-यासाठी जागा उपलब्ध करून देणारे इसमांवर कारवाई केली आहे.

पोलीस स्टेशन भाग्यनगर हद्दीत सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पथकातील चार्ली क्रमांक एक व दोन मधील पोलीस अंमलदार यांनी पेट्रोलिंग दरम्यान जिराईत मैदान, भगीरथ नगर येथे सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असलेल्या 02 इसमास ताब्यात घेवून त्याचेवर पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे म.पो.का. कलम 110/117 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच एकता नगर येथे 01 इसम दारू पिणेसाठी ग्लास, पाणी पाऊच ची विक्री करत असताना मिळून आल्याने त्याचेवर पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 68 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण ह‌द्दीत सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पथकातील चार्ली क्रमांक एक मधील पोलीस अंमलदार यांनी पेट्रोलिंग दरम्यान ढवळे कॉर्नर येथे सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असलेल्या 01 इसमास ताब्यात घेवून त्याचेवर पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे म.पो.का. कलम 110/117 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच ढवळे कॉर्नर येथे 05 इसम दारू पिणा-यासाठी जागा उपलब्ध करून देणारे यांचेवर पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 68.84 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन शिवाजीनगर हददीत सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पथकातील चार्ली क्रमांक एक दोन तीन मधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पेट्रोलिंग दरम्यान साठे चौक येथे 01 इसम दारू पिणेसाठी जागा उपलब्ध करून देत असताना मिळून आल्याने त्याचेवर पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 68 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड शहरात जनतेला आवाहन केले आहे की, कोणीही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नये, तसेच दारू पिणाऱ्यासाठी जागा उपलब्ध करून देवू नये, व सार्वजनिक शांततेचा भंग करू नये, अन्यथा संबधीत इसमांवर कडक कारवाई करण्यात येईल.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button