नांदेडमहाराष्ट्र

Vande Mataram : वंदे मातरम गीताला १५० वर्ष पूर्ण — हिमायतनगरात विविध कार्यक्रमांनी राष्ट्रभक्तीचा उत्सव

हिमायतनगर, अनिल मादसवार| देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताला यंदा १५० वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने हिमायतनगर शहरातील हुतात्मा जयवंतराव महाविद्यालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहीर पथकाने देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून वातावरण देशभक्तीने भारून टाकले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन करून एकात्मतेचा आणि राष्ट्रीय भावनेचा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रा. प्रकाश खंदारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रम समितीच्या अध्यक्षा तथा तहसीलदार पल्लवी टेमकर, पोलीस निरीक्षक अमोल भागात, प्राचार्य जे एल गायकवाड, गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, शिक्षक सुधीर उत्तरवार, व्यापारी श्रीनिवास चिद्रावार, मनोज मादसवार, किशोर रायेवार, क्रीडा पटू खंडू चव्हाण, पत्रकार अनिल मादसवार आदी मान्यवर उपस्थित होते.

oplus_0

या प्रसंगी शाहीर रामराव वानखेडे व त्यांच्या संचातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारित लघुनाटिका सादर केली. प्रमुख मार्गदर्शक रमेशराव श्रीमंगले यांनी मार्गदर्शनातून ‘वंदे मातरम्’ गीताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची आणि त्यातील राष्ट्रीयतेच्या भावनेची जाण करून देत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमास शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button