Friday, June 26

Tag: 150 years

Vande Mataram : वंदे मातरम गीताला १५० वर्ष पूर्ण — हिमायतनगरात विविध कार्यक्रमांनी राष्ट्रभक्तीचा उत्सव

Vande Mataram : वंदे मातरम गीताला १५० वर्ष पूर्ण — हिमायतनगरात विविध कार्यक्रमांनी राष्ट्रभक्तीचा उत्सव

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताला यंदा १५० वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने हिमायतनगर शहरातील हुतात्मा जयवंतराव महाविद्यालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहीर पथकाने देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून वातावरण देशभक्तीने भारून टाकले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन करून एकात्मतेचा आणि राष्ट्रीय भावनेचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रा. प्रकाश खंदारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रम समितीच्या अध्यक्षा तथा तहसीलदार पल्लवी टेमकर, पोलीस निरीक्षक अमोल भागात, प्राचार्य जे एल गायकवाड, गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, शिक्षक सुधीर उत्तरवार, व्यापारी श्रीनिवास चिद्रावार, मनोज मादसवार, किशोर रायेवार, क्रीडा...
error: Content is protected !!