Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

February 5, 2026

Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

February 5, 2026

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई
  • Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ
  • Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
  • Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन
  • PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन
  • Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला
  • Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Collecter abhijit raut ; उमेदवार ठरले : आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत -NNL
नांदेड महाराष्ट्र व्हिडीओ November 4, 2024

Collecter abhijit raut ; उमेदवार ठरले : आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत -NNL

NNL TeamBy NNL TeamNovember 4, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

 * लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अंतिम 19 उमेदवार 
* नऊ विधानसभेसाठी 165 उमेदवार रिंगणात
* लोकसभेसाठी 19 लाख 8 हजार 546 मतदार
* विधानसभेसाठी 27 लाख 87 हजार 947 मतदार
* जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी तयार

नांदेड। महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या महत्त्वपूर्ण टप्प्याची सुरूवात आज पासून झाली आहे. नऊ विधानसभेसाठी 165 उमेदवार मैदानात आहेत. तर नांदेड जिल्ह्यात याचवेळी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत. 14 दिवस प्रचारासाठी मिळणार असून 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पुढच्या रणधुमाळीत उमेदवारांपासून ते सामान्य मतदारांपर्यंत सर्वांनीच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच भयमुक्त व पारदर्शी वातावरणात मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

20 नोव्हेंबरला मतदान – निवडणूक प्रक्रियेतील आपल्या दुसऱ्या पत्रकार परिषदेत मोठ्यासंख्येने तरुणांनी मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच येणाऱ्या 20 नोव्हेंबरला आपल्या भविष्याचा निर्णय घेतांना कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील 6 मतदारसंघामध्ये एकाचवेळी लोकसभा व विधानसभेसाठी मतदान करावे लागणार आहे. अवघ्या काही सेकंदामध्ये ही प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व लागणाऱ्या मतदान यंत्रणांची उपलब्धता विपूल प्रमाणात असल्याची माहिती त्यांनी दिली. सोबतच दिवस छोटा असल्यामुळे सर्व मतदान केंद्रावर सायंकाळीच दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एकूण मतदार –  यावेळी त्यांनी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 19 लाख 8 हजार 546 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये 9 लाख 78 हजार 234 पुरूष तर 9 लाख 30 हजार 158 महिला व 154 तृतीयपंथीय मतदार असल्याची आज पर्यंतची यादी जाहीर केली. ज्या सहा विधानसभा क्षेत्रात ही निवडणूक होणार आहे त्याची मतदार संख्याही जाहीर करण्यात आली. लोकसभेमध्ये भोकर विधानसभा क्षेत्रात 3 लाख 3 हजार 103, नांदेड उत्तर 3 लाख 58 हजार 918, नांदेड दक्षिणमध्ये 3 लाख 16 हजार 821, नायगावमध्ये 3 लाख 10 हजार 375, देगलूरमध्ये 3 लाख 12 हजार 237,  मुखेडमध्ये 3 लाख 7 हजार 92 एवढे मतदार आहेत. त्यामुळे एकूण 19 लाख 8 हजार 546 मतदार मतदान करणार आहेत.  

तर विधानसभेसाठी आणखी तीन तालुके यामध्ये वाढले असून किनवटमध्ये 2 लाख 78 हजार 65, हदगावमध्ये 2 लाख 99 हजार 86, लोहामध्ये 3 लाख 1 हजार 650 मतदार मतदान करणार आहेत. एकूण 9 विधानसभा क्षेत्रामध्ये 27 लाख 87 हजार 947 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी येत्या 20 नोव्हेंबरला मतदानासाठी बाहेर पडावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

रिंगणातील उमेदवार – आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत वैध 39 उमेदवारांपैकी 20 उमेदवारांनी अर्ज परत घेतला. त्यामुळे 19 उमेदवार रिंगणात आहेत. किनवट विधानसभेसाठी 29 उमेदवारांपैकी 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे 17 जण रिंगणात आहेत.  हदगाव विधानसभेसाठी वैध असणाऱ्या 63 उमेदवारांपैकी 39 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे 24 उमेदवार रिंगणात आहेत. भोकर विधानसभेमध्ये 140 वैध उमेदवारांपैकी 115 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे 25 उमेदवार रिंगणात आहेत.नांदेड उत्तरमध्ये 72 वैध उमेदवारांपैकी 39 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे 33 उमेदवार रिंगणात आहेत.

नांदेड दक्षिणमध्ये एकुण 51 वैध उमेदवारांपैकी 31 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 20 उमेदवार रिंगणात आहेत. लोहा विधानसभा क्षेत्रात वैध 33 उमेदवारांपैकी 19 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 14 उमेदवार रिंगणात आहेत. नायगाव विधानसभा क्षेत्रात 26 वैध उमेदवारांपैकी 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 10 उमेदवार रिंगणात आहेत.

देगलूर विधानसभा निवडणुकीत 27 वैध उमेदवारांपैकी 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे 11 उमेदवार रिंगणात आहेत. मुखेड विधानसभेमध्ये 17 वैध उमेदवारांपैकी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे 11 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यामध्ये 9 विधानसभेसाठी एकूण 458 उमेदवारांपैकी 293 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे एकूण 165 उमेदवार रिंगणात आहेत. 

पाच केंद्रे संवेदनशील – जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्या 3 हजार 88 असून मतदान केंद्रांची ठिकाणे 1 हजार 992 आहेत. यामध्ये शहरी 396 तर ग्रामीण 1 हजार 596 मतदान केंद्र आहेत. अनेक जागेवर एका ठिकाणी अनेक मतदान केंद्र आहेत. शंभर टक्के मतदान अधिकारी महिला असलेले मतदान केंद्र 9 आहेत तर शंभर टक्के अधिकारी दिव्यांग असलेले मतदान केंद्र 9 आहेत. शंभर टक्के मतदान अधिकारी युवा असलेले मतदान केंद्र 9 आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या 5 असून यामध्ये पांगरपहाड (किनवट), चोरंबा (हदगाव), पाकीतांडा (भोकर), रामतीर्थ (देगलूर), कोलेगाव (मुखेड) यांचा समावेश आहे. याठिकाणच्या सर्व मतदान प्रक्रियेवर विशेष लक्ष असणार आहे.

Candidates decided Strictly follow model code of conduct - District Election Returning Officer Abhijit Raut
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleLoha assembly ; लोहा विधानसभा मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात ; १९ नामनिर्देशन पत्र मागे -NNL
Next Article Police department ; सामान्य, खर्च व पोलीस विभागाचे निरीक्षकांचे दूरध्वनी जाहीर; नागरिकांनी आवश्यकतेनुसार संपर्क साधण्याचे आवाहन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Five senior journalists awarded : पाच ज्येष्ठ पत्रकारांना ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर

June 24, 2025

Anil Madaswar ; नांदेड जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेच्या उत्तर कार्याध्यक्षपदी अनिल मादसवार यांची निवड — पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल

November 17, 2025

Sakal Maratha : सकल मराठा बांधवांच्या वतीने हिमायतनगर शहर तालुका कडकडीत बंद -NNL

September 23, 2024

मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडावा म्हणून १०६ अमरनाथ यात्रेकरूंनी माता रत्नेश्वरीला साकडे -NNL

July 1, 2024
Advertisement
टॉप बातम्या

child sexual abuse : बाल लैंगिक शोषणावरील मूलभूत समुपदेशन व परिणाम या विषयावरील प्रशिक्षण संपन्न -NNL

Dolara Accident ; डोलारा येथे बैलगाडी उलटून एक शाळकरी मुलगा ठार ; तर दोन विद्यार्थिनी जखमी‌ परिसरात हळहळ – NNL

Vadar community : घाम गाळून रस्ते,धरणे,इमारती बांधणाऱ्या वडार समाजाला न्याय द्या – वडार समाजाची मागणी

thief looted 13 thousand : इस्लापूरच्या भारतीय स्टेट बँकेतच चोरट्याने शेतकऱ्याच्या मुलींच्या बैगेतून 13 हजार केले लंपास

Bariyamsingh Nawab passed away ; बरियामसिंघ नवाब यांचे निधन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

February 5, 2026

Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

February 5, 2026

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?