HomeनांदेडSports Award ; जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन -NNL

Sports Award ; जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन -NNL

नांदेड।  क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत नांदेड जिल्ह्यात दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरीत करण्यात येतो. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील खेळाडू, मार्गदर्शक यांच्याकडून सन 2020-21, 2021-22, 2022-23 व 2023-24 (4 वर्षे) या वर्षातील पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छूक खेळाडू व मार्गदर्शकांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज 12 जानेवारी 2025 पर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी व अर्ज प्राप्त करण्यासाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर यांचा मो. क्र. 7517536227 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू पुरुष, महिला व दिव्यांग यांनी केलेल्या कार्याचे/योगदानाचे मुल्यमापन व्हावे त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा त्यांच्यापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी या हेतूने जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार प्राप्त करण्यासाठी केलेली कामगिरी ही त्या-त्या वर्षातील 1 जुलै ते 30 जून दरम्यानच्या कालावधी गृहीत धरण्यात येणार आहे. पुरस्कार संख्या गुणवंत क्रीडा मार्गदर्शक-1, गुणवंत खेळाडू-1 (पुरुष-1, महिला-1, दिव्यांग-1) पुरस्काराचे स्वरुप हे प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

मार्गदर्शक हा मागील 10 वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते  तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (खेलो इंडिया)  मधील राष्ट्रीयस्तरापर्यतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील असा क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहील. गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी मागील 5 वर्षातील उत्कृष्ट ठरणारी 3 वर्षाची कामगिरी ग्राह्य धरण्यात येईल. क्रीडा मार्गदर्शनासाठी सांघीक अथवा वैयक्तीक मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल गेम्स, वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेला खेळाडू अथवा राज्य, जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यत यश मिळविणारे किमान तीन खेळाडू घडविणारा मार्गदर्शक तसेच क्रीडा मार्गदर्शकांनी खेळाडू किती वर्षे प्रशिक्षण दिले याचेही तुलनात्मक मुल्यमापन करण्यात येणार आहे. अर्जदाराने मार्गदर्शन केलेल्या खेळाडूचे विहित नमुन्यातील हमीपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

खेळाडू पुरस्कारासाठी पात्र क्रीडा प्रकार-ॲथेलेटिक्स, बॅडमिंटन, आर्चरी, बास्केटबॉल, कयाकिंग/कनोईंग, सायकलिंग, क्रिकेट, तलवारबाजी, हॉकी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॅन्डबॉल, बॉक्सिंग, गोल्फ, पॉवरलिफ्टींग, हॉर्स रायडींग, लॉनटेनिस, नेमबाजी, स्विमींग (जलतरण) डायव्हीग, वॉटर पोलो, ट्रायथलॉन, बॉडीबिल्डिंग, ज्युदो मॉर्डन, पेंटॅथलॉन, रग्बी, रोईंग, स्पोर्ट्स क्लाइंबिंग, स्क्वॅश, टेबल टेनिस, तायक्वाँदो, व्हॉलीबॉल, वेटलिफटींग, कुस्ती, स्केटींग, वुशू, कॅरम, सॉफ्टबॉल, बेसबॉल,कबड्डी, खो-खो, मल्लखांब, आट्यापाट्या, बुध्दीबळ, बिलियर्डस ॲन्डस्नुकर, याटींग इत्यादी खेळाचा समावेश करण्यात आला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments