नांदेडक्राईम

CIDCO ; सिडको सराफा बाजारात पोलीस गस्त वाढवावी, सराफा असोसिएशन मागणी – NNL

नवीन नांदेड l सिडको भागातील सराफा बाजारात पोलीस पेट्रोलिंग गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना ग्रामीण पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष भेटून सराफा असोसिएशन अध्यक्ष गिरीधर मैड व पदाधिकारी यांनी निवेदन दिले असून चर्चा ही केली.

मागील गेल्या दोन वर्षापुर्वी सिडको सराफा बाजारात असलेल्या तीन ते चार दुकानातुन संबंधित व्यापारी यांच्यी सोनं चांदी दांगीने‌ ऐवज असलेली बॅग भर दिवसा मुख्य बाजारपेठ मधुन‌ अज्ञात चोरांनी दुचाकी वरून पळविली होती, यानंतर सराफा बाजारात रोज सकाळी 9 व सायंकाळी 6ते 9 दरम्यान पोलीस गस्त दैनंदिन होती,परंतु यानंतर ही गस्त बंद‌ झाली असुन बाजारात काही अनोळखी इसम संशयास्पद फिरत आहेत, यामुळे बाजारपेठेत दहशत वातावरण निर्माण झाले असून तात्काळ गस्त वाढवावी अशी मागणी सराफा असोसिएशन अध्यक्ष गिरीधर मैड, उपाध्यक्ष रितेश दहिवाळ,सचिव गुरूप्रसाद डहाळे, कोषाध्यक्ष प्रमोद शहाणे, सहसचिव दिपक टाक, संतोष पांचाळ, भालचंद्र दिक्षीत,अमोल धानोरकर,अनिल‌ पांचाळ,गोपाळ बोकण यांच्या सह असोसिएशन पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button