लोहा l आजच्या काळात सरकारी नौकरीसाठी प्रचंड स्पर्धा आहे.असा परिस्थितीत स्वतःचा व्यवसाय उभा करून त्यात करिअर करता येईल .रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आपण निवडलेल्या व्यवसायाला आधुनिकतेचा “टच”देऊन त्यात यश मिळविता येते असे मार्गदर्शन भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले


लोहा शहरात अन्वर पठाण या युवकांच्या फ्रेन्डस ड्रायक्लिनर्स च”चे उदघाटन भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रविणताताई देवरे – चिखलीकर याच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी माजी उपनगराध्यक्ष दत्ताजी वाले, माजी नगरसेवक भास्कर पाटील पवार, अवि पाटील पवार, अशोक सोनकांबळे, सिकंदर शेठ, रशिदखॉ पठाण, आलमखॉ पठाण, अहेमद शेख, ऐजाज शेख, रमजान पठाण, सोहेल पठाण काबेगांवकर, अरबास शेख, रज्जाक शेख, खोलेद पठाण, समीर शेख, सरफराज लदाफ, ताहेर पठाण, अयान शेख, साहिल शेख, साहील पठाण व अजीस शेख आदींची उपस्थीती होती .


उदघाटक प्राणिताताई देवरे चिखलीकर म्हणाल्या की, आज प्रचंड स्पर्धा आहे सरकारी नौकरी साठी जागा मोजक्याच आणि हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी असतात .असा स्पर्धेत सगळ्यांनाच संधी मिळणार नाही म्हणून तरुणांनी रोजगाराच्या संधी शोधल्या पाहिजे .अन्वर पठाण व सहकाऱ्यांनी शहरात ड्रायक्लिनिक हा व्यवसाय साकारला मेहनत जिद्द, चिकाटीतून तसेच दर्जेदारपणा व्यवसायाला भरभराटी देते हे सगळे .त्यासाठी अन्वर व सहकारी हे प्रयत्नशील असतील त्याच्या व्यवसायाची गती वाढावी असा शुभाकामना प्राणिताताई यांनी व्यक्त केल्या.

Show quoted text


