बिलोली/नांदेड,गोविंद मुंडकर। बिलोली तालुक्यातील कार्ला (बु.)येथे रमेश हनुमंतराव जामनोर यांची पत्नी नेहमी आजारी असल्यामुळे त्यांनी दवाखान्यात दाखवून सुद्धा त्यांची तब्येत बरी होत नसल्यामुळे रमेश जामनोर यांनी कर्नाटकातील भोंदू वैद्य यांना बोलावून घेतले.तो भोंदू वैद्य यांनी मंत्र-तंत्र व दैवशक्तीने आजार कमी करतो असे सांगून त्यांच्या घरामध्ये अंगात आल्याचे भासवून अनिष्ट अघोरी प्रथा करत त्या भोंदू बाबांनी रमेश जामनोर यांच्या घरातील चारही कोपरे खोदून लोखंडी खिळे,बिबे,लिंबू,कवड्या, काळीदोरी इत्यादी वस्तू काढून दिले;तसेच त्यांना सांगण्यात आले की;तुमचा आजार नसून तुमच्या घरावरच करनी व बाहेर बाधा केलेली होती ती मी आता पूर्णपणे कमी करतो असे सांगून आर्थिक प्राप्तीच्या उद्देशाने हा सर्व प्रकार करत होता. हे सर्व प्रकार शेजारच्या लोकांनी पाहिले व काहीतरी जादू टोन्याचा प्रकार असावा या उद्देशाने गावातल्या बऱ्याच लोकांना ही घटना समजल्यावर एकत्र आले.
या घटनेचा विरोध करत गावातील पोलीस पाटील सौ.रेखा जामनोर यांचे पती गजानन जामनोर यांनी तात्काळ 112 वर कॉल करून सदरील घटनेची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी भेट देऊन त्या दोन्हीही भोंदू बाबांना ताब्यात घेण्यात आले.बिलोली पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक श्री.अतुल भोसले यांनी या घटनेची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदडे व बालाजी यलगंदरे यांना बोलावून घेतले व घटनास्थळी पंचनामा, पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस हेडकॉन्स्टेबल आनंद शिंदे, पोलीस आमदार व्यंकट घोंगडे यांनी आले.
कार्ला (बू) येथील रमेश जामनोर यांच्या घरी म्हणजेच घटनास्थळी घरातील चारही कोपऱ्यांना चार खड्डे खोदलेले आढळून आले व त्या ठिकाणी लिंबू, बिबे, लोखंडी खिळे,काळादोरा, कवड्या असा प्रकार आढळून आला. या सर्व प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण तयार करून दैवीशक्ती व अघोरी मंत्र-तंत्र्याच्या सहाय्याने आजार बरा करतो असे सांगून फसवत असल्याचे निदर्शनास आले.वरील सर्व साहित्य जप्त केले. फिर्यादी गजानन शंकरराव जामनेर वय 29 वर्षे,व्यवसाय शेती,राहणार कार्ला (बु.) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे बिलोली येथे गुरुनं 256/2013 कलम 3(4) 2 (1) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश 2013 या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.अतुल भोसले यांनी करत आहेत.