कृषीनांदेड

Sagvi deglur : सागवीत वादळी वाऱ्यामुळे केळी पपईचे बाग उध्वस्त; नूकसानीची पहाणी करण्याकडे दुर्लक्ष

देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील सागवी उमर येथील शेतकर्यांनी केळी व पपई पिकाची लागवड केली. शेतकरी केळीची तोडणी करणार तितक्यात आलेल्या सुसाट वादळी वारे मुसळधार पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील कोणतेही शासकीय अधिकारी नूकसानीची पहाणी करण्यासाठी आले नाही. हि शरमेची बाब आहे वरिष्ठांनी याची दखल घेऊन शेतकर्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे.

सतत दोन दिवसांपासून सुसाट वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे घरादाराची जनावाराचया गोटयाची तसेच शेतातील केळी व पपई पिकाची लागवड केली. मात्र निसर्गाच्या लहरी पणामुळे सुसाट वादळी वाऱ्यासह पाऊसाने झोडपल्याने होत्याचा नव्हते होवून ऐन केळी तोडण्याच्या मोसमात येताच निसर्ग कोपला. याने शेतकर्यांच्या पदरी निराशाच आली असून, सर्वञ पावसामुळे हाहाकार माजून अतोनात नुकसान झाले.

पिकाची नासाडी होऊन दोन तीन दिवस उलटत असताना आजपर्यंत शहापूर परिसरातील पहाणी करण्यासाठी कोणतेही अधिकार आले नाही. त्यामुळे शेतकर्यात नाराजीचा सूर उमटत असून, वरिष्ठांनी याची दखल घेऊन नुकसान झालेल्या पिकाची पहाणी करून अनुदान देण्याची मागणी शेतकर्यात होते आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button