नांदेड | डिजिटल बँकिंग जनजागृती मोहिमेअंतर्गत नागर्जुन पब्लिक स्कूल, नांदेड येथे एचडीएफसी बँकेतर्फे “सुरक्षित डिजिटल बँकिंग” या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश शिक्षकांमध्ये डिजिटल बँकिंग सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.


या संवादात्मक सत्रात १४० हून अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला. कार्यशाळेदरम्यान बँकेच्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांनी डिजिटल सुरक्षेशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय सविस्तर समजावून सांगितले, ज्यामुळे शिक्षकांना ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाचे मार्ग अधिक स्पष्टपणे कळाले.



कार्यशाळेतील प्रमुख मुद्दे: सुरक्षित डिजिटल बँकिंग पद्धतींचे प्रशिक्षण. फसवणूक करणाऱ्यांकडून वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतींची माहिती. वैयक्तिक बँकिंग माहिती गोपनीय ठेवण्याचे महत्त्व. अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन. ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी आवश्यक काळजी उपाय.


श्री. मनीष अग्रवाल (एक्झिक्युटीव्ह वाइस प्रेसिडेंट – क्रेडिट इंटेलिजन्स अँड कंट्रोल) म्हणाले: “आज डिजिटल व्यवहारांचा वापर वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित बँकिंग सवयी अंगीकारणे अत्यावश्यक आहे. जागरूकता वाढवणे हेच फसवणूक रोखण्याचे प्रभावी शस्त्र आहे. कुणालाही बँकिंग माहिती देऊ नये आणि संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये.”


