Monday, June 29

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

रग्बी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्यातील दोन खेळाडूची महाराष्ट्र रग्बी संघात निवड…NNL

Uncategorized
नांदेड। नेरळ जिल्हा रायगड या ठिकाणी वयोगट १४ वर्षातील मुलीच्या संघात या खेळाडूंनी कर्णधार व उपकर्णधार म्हणून खेळाची पारी सांभाळत खेळ खेळत व्यवस्थित रित्या आपल्या संघाला सेमी फायनल पर्यंत पोहोचवले तसेच पहिलाच गोल करून आपल्या संघाला खेळ प्रदर्शन चांगल्या रीतीने करत असताना त्याच कामगिरीच्या बदल्यात त्या दोघींची महाराष्ट्र रग्बी निवड चाचणी सरावासाठी निवड झाली होती. त्या सदरील महाराष्ट्र निवड प्रशिक्षण शिबिर दि.१६ ते १९ डिसेंबर २०२२ दरम्यान नंदुरबार जिल्हा येथे चालू असताना त्यामध्ये महाराष्ट्र भरातून आलेल्या खेळाडूंमध्ये नांदेड जिल्ह्यातील (केंद्रीय विद्यालय एस सी आर नांदेड) कु.आदिती प्रवीणराव बोरकर, (विमल इंग्लिश स्कूल भोकर) कु.किंजल गोविंद थोरात या दोन खेळाडू मुलींची रग्बी फुटबॉल महाराष्ट्र संघात निवड झाली असून दि. २१ ते २३ डिसेंबर २०२२ रोजी अहमदाबाद, गुजरात राज्य येथे होणाऱ्या राष्ट्रीय ...

बळीरामपुर ग्रामपंचायतीच्या विकासाठी नवनिर्वाचित संरपच व सदस्यांनी एकत्र यावे -जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे -NNL

Uncategorized
नविन नांदेड। बळीरामपुर गावाच्या विकासासाठी पक्ष,गट तट ,भेदभाव न करता पाणीपुरवठा व ईतर योजनेसाठी एकत्र येऊन गावाचा विकास साठी एकत्र येऊन नवनिर्वाचित अपक्ष संरपचासह सदस्यांनी एकत्र येऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य तथा नांदेड तालुका काँग्रेस कमिटीच्ये अध्यक्ष मनोहर पाटील शिंदे यांनी बळीरामपुर ग्रामपंचायत नवनिर्वाचित संरपच व सदस्य यांच्या सत्कार सोहळया प्रसंगी केले. जिल्हा परिषद सदस्य तथा नांदेड तालुका काँग्रेस कमिटीच्ये तालुका अध्यक्ष मनोहर पाटील शिंदे व धनेगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने बळीरामपुर ग्रामपंचायत नवनिर्वाचित संरपच व ग्रामपंचायत सदस्या यांच्या सत्कार शिंदे यांच्या निवासस्थानी २२ डिसेंबर रोजी शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य तथा जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य भुंजगराव भालके,संरपच पिटुं पाटील शिंदे, माजी संरपच दिलीप गजभ...

लिटल स्टेप इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थिनींची बॅडमिंटन स्पर्धेत विभागीय स्तरावर झेप -NNL

Uncategorized
नायगांव, रामप्रसाद चन्‍नावार। एज्युकेशन सोसायटी नायगांव बा.संचलीत लिटल स्टेप इंग्लिश स्कुल नायगांव च्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धेत तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय पातळीवर उत्तुंग कामगिरी करत तालुका व जिल्हा स्तरावर 17 वर्षाखालील मुली या गटात बॅडमिंटन या खेळात विभागीयस्तर गाठले. त्याच बरोबर 17 वर्षा खालील मुलींच्या संघांनी खो-खो या क्रीडा प्रकारात चुरशीच्या सामन्यात द्वितीय क्रमांक पटकावला याच गटात 100×4 रिले प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून शालेय स्तरावर विजय संपादन केला या विजयाबद्दल विभागीय स्तरावर विजय संपादन करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सर्व खेळाडू आणि त्यांचे मार्गदर्शक श्री जे.एन. ठाकूर सर व श्री बालाजी शिंदे सर यांचे संस्थेचे अध्यक्ष मा श्री वसंतराव चव्हाण साहेब, सचिव श्री रवींद्र पा. चव्हाण, समन्वयक श्री के.यु.गारटे व स...

जिल्हास्तरीय मैदानी खेळात ग्रीन व्हॅलीच्या विद्यार्थ्यांवर सुवर्णपदकांचा वर्षाव तर विभागीय स्तरावर तीन विद्यार्थ्यांची निवड -NNL

Uncategorized
नायगांव, रामप्रसाद चन्‍नावार। जिल्हा परिषद नांदेड, क्रीडा विभाग. आयोजित तालुका व जिल्हास्तरीय मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. दि.12/12/2022 रोजी कुष्णुर येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धां आयोजन तर जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन दि.17/12/2022 सायन्स कॉलेज नांदेड येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध मैदानी क्रीडा प्रकार घेण्यात आले त्यात प्रामुख्याने थाळीगोळा,गोळाफेक, लांब उडी, उंच उडी, तिहेरी लांब उडी, रिले, खो-खो, कब्बडी अशा विविध प्रकारांचा अंतर्भाव होता. त्यात ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव. या शाळेच्या 58 विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय स्पर्धेतआपला सहभाग नोंदविला होता व त्यापैकी 29 विद्यार्थ्यांनी विविध प्रकारात प्रथम पारितोषिक पटकावले (29सुवर्ण पदक) तर 27 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्यात जिल्हास्तरीय स्पर्धेत शाळेच्य...

तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत जनता क. म. वि. चे यश -NNL

Uncategorized
नायगांव, रामप्रसाद चन्‍नावार। शालेय क्रीडा स्पर्धा 2022 अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत जनता कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यश मिळविले. यात 19 वर्ष गट मुले 1500 मी धावणे प्रथम कांबळे जयवर्धन,200 मी धावणे द्वितीय इबितदार ओंकार, लांब उडी प्रथम मोरे मनिष, उंच उडी प्रथम गायकवाड प्रशांत, भाला फेक प्रथम मोरे मनिष, थाळी फेक प्रथम गायकवाड प्रशांत, गोळा प्रथम शेख समीर, गोळा द्वितीय शेख अय्याज, हार्डल्स 110 मी प्रथम गायकवाड प्रशांत, रिले 100 प्रथम शेख रजा, भोळे केतन, इबितदार ओंकार, गायकवाड प्रशांत, कबड्डी मध्ये द्वितीय, क्रिकेट मधे द्वितीय. 19 वर्ष खालील मुली गटाने 100मी धावणे प्रथम सोनकांबळे दीपाली,200मी धावणे प्रथम माने संजीवनी, गोळा भला थाळी फेक प्रथम ठाकूर निकिता, लांब उडी द्वितीय श्रीमंगले मयुरी, रिले प्रथम 100 कुऱ्हाडे मयुरी, शिंदे प्रिया, राखे गीता, श्रीमंगले मयुरी य...

मुस्लिम स्मशानभूमीत”मनरेगा” अंतर्गत लावलेल्या वृक्षारोपणाची जोपासना -NNL

Uncategorized
उस्माननगर, माणिक भिसे। येथील ग्रामपंचायत कार्यालय व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत संयुक्तपणे मुस्लिम समाजाचे स्मशानभूमीत जवळपास साडेसहा एकरच्या असलेल्या कब्रस्थान जागेत सागवान रोपांची लागवड केली ,त्या रोपांची वाढ जोमदार होण्यासाठी मुस्लिम बांधव स्वस्फुर्तीने व श्रमदान करून गाजर गवताचे निर्मुलनासाठी पुढे आले आहेत. उस्माननगर येथील मौलवी बाबू पिंजारी व समाजातील प्रतिष्ठित मौलाना यांच्या देखरेखीखाली मुस्लिम तरुणांनी व ज्येष्ठ नागरिक दररोज कब्रस्तानात जावून गाजर गवत कापून परिसर स्वच्छ केला जात आहे. उस्माननगर येथील रोजगार सेवक संभाजी पाटील काळम व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने " मनेरागा " अंतर्गत वृक्षलागवड केली.या वृक्षलागवडी मुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहून वातावरणात थंड सावली मिळणार आहे. रोपांची काळजी घेण्यासाठी रोपांना पाणी देणे, गाजर गवत, गवत, कचरा काढून ट...

श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेस प्रारंभ -NNL

Uncategorized
नांदेड, रविंद्रसिंघ मोदी। समस्त देशात सध्या प्रतिष्ठित नावोल्लेख होत असलेल्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट स्पर्धेचे उद्धघाटन गुरुवार, दि. 22 डिसेम्बर रोजी खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम येथे पार पडले. यंदाची ही स्पर्धा 49 वीं आहे. गुरुवारी दुपारी 12 वाजता सुमारास गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुर साहेबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्या शुभास्ते श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुरुद्वारा सचखंड हजुरसाहिबचे सहायक जत्थेदार संतबाबा रामसिंघजी, गुरुद्वारा श्री लंगर साहेबचे मुखी संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवा वाले, गुरुद्वारा मातासाहेब देवाजी येथील जत्थेदार संतबाबा तेजासिंघजी, गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रभारी अधीक्षक स. शरणसिंघ सोढी यांची उपस्थिती होती....

यळकोट यळकोट जय मल्‍हार घोषाने माळेगाव यात्रेला सुरुवात -NNL

Uncategorized
श्रीक्षेत्र माळेगाव। उत्‍तम जागा पाहूनी मल्‍हारी देव नांदे गड जेरुरी अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्‍हार म्‍हणत, बेलभंडा-याची उधळण करीत पारंपारीक पध्‍दतीने यंदाही माळेगावच्‍या श्रीखंडोबा रायाच्‍या यात्रेस शुभारंभ झाला आहे. यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्‍या व मानक-यांच्‍या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने स्‍वागत करण्‍यात आले. प्रारंभी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पुजा करण्‍यात आली. यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे पाटील, आशाताई श्यामसुंदर शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, जिल्हा परिषद खाते प्रमुखांची उपस्थिती होती. त्‍यानंतर दुपारी पालखी पुजनानंतर देव स्‍वारी काढण्‍यात आली यावेळी मानक-यांचा गौरव - पालखीचे मानकरी गणपतराव म...

देशाचे राष्ट्रपिता एकच आहेत आणि ते म्हणजे महात्मा गांधी – नाना पटोले -NNL

Uncategorized
नागपूर। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा अपमान भारतीय जनता पक्ष जाणीवपर्वक करत आहे. या प्रकरणी भाजपा नेत्यांनी अजून माफी मागितलेली नाही. उलट दररोज कोणीतरी महापुरुषांचा अपमान करतच आहे. आज पुन्हा एकदा महापुरुषांचा अपमान केला गेला. महात्मा गांधी हे जुने राष्ट्रपिता आता नरेंद्र मोदी नवे राष्ट्रपिता आहेत असे म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केला आहे पण या देशाचे राष्ट्रपिता एकच आहेत आणि ते म्हणजे महात्मा गांधी, इतर कुणाची ती पात्रता नाही, असा सणसणीत टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. प्रसार माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काही लोकांना नवीन भारत हवा आहे, या नव्या भारतात लोकशाही, संविधान धाब्यावर बसवून काही मुठभर ल...

फोनटॅपिंग प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा – नाना पटोले -NNL

Uncategorized
नागपूर। राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना २०१६- १७ साली अवैधरितीने लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी व पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले. या प्रकरणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हेही दाखल झाले. चौकशी समितीनेही त्यांना दोषी ठरवले असताना त्यांना क्लिनचिट देण्याचा प्रयत्न ईडी सरकार करत आहे. हे प्रकरण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व गृहमंत्री असतानाचे असून आताही तेच गृहमंत्री आहेत. फोन टॅपिंग प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, लोकप्रतिनिधी, पत्रकार व अधिकारी यांची वेगळी नावे ठेवून त्यांचे फोन टॅप केले गेले. हा आमच्या व्यक्तीस्वातंत्र्यांवरचा घाला आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री ...
error: Content is protected !!